Tuesday, March 28, 2023
Tuesday, March 28, 2023

घरFact Checkयूपीमध्ये 'हिंदुत्ववादी गुंड' 'दलित मुलीवर' हल्ला करत आहेत? नाही, एमपी मधील व्हिडीओ...

यूपीमध्ये ‘हिंदुत्ववादी गुंड’ ‘दलित मुलीवर’ हल्ला करत आहेत? नाही, एमपी मधील व्हिडीओ खोट्या दाव्यासह व्हायरल

(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम वसुधा बेरी यांनी केले आहे)

पुरुषांचा एक गट एका महिलेचे केस ओढत आहे, लाथा मारत आहे आणि काठीने तिच्यावर प्राणघातक हल्ला करत आहे, असा एक विचलित करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

हिंसक घटनेचे विचलित करणारे फुटेज, जे एका पाणवठ्याजवळील मोकळ्या मैदानात घडताना दिसत आहे, यूपीमध्ये जात-आधारित भेदभावाचा व्हिडिओग्राफिक पुरावा म्हणून शेयर केले जात आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी असा आरोप केला आहे की व्हिडिओमध्ये “हिंदुत्ववादी गुंड” “यूपीमधील दलित मुलीवर” नदीत ‘आंघोळ करून नदीचे पावित्र्य बिघडविल्याबद्दल’ तिच्यावर हल्ला करत आहेत.

टीप: व्हिडिओमध्ये विचलित करणारे व्हिज्युअल आहेत आणि ते या लेखात एम्बेड केलेले नाहीत.

अनेक ट्विटर युजर्सनी पुढील कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला आहे, “एका दलित मुलीने UP मधील एका नदीत आंघोळ केली होती. नदीचे पावित्र्य बिघडवल्याबद्दल हिंदुत्ववादी गुंडांनी त्या मुलीवर अत्याचार केला. चला मोठ्या प्रमाणात शेअर करून राज्यकर्त्यांना कळवूया.”

अशा ट्विटच्या संग्रहित आवृत्त्या येथे, येथे, येथे आणि येथे पाहिल्या जाऊ शकतात.

हा व्हिडीओ फेसबुकवरही याच दाव्याने फिरत आहे.

अशा फेसबुक पोस्टच्या लिंक्स इथे, इथे, इथे आणि इथे मिळू शकतात.

Fact Check/ Verification

Google वर “Men thrash woman,” “sticks” आणि “open field” या कीवर्डच्या शोधामुळे आम्हाला NDTV द्वारे 4 जुलै 2021 रोजी ‘मध्य प्रदेश शॉकर ऑन कॅमेरा: वूमन बीटन विथ स्टिक्स बाय फॅमिली’ शीर्षकाचा रिपोर्ट मिळाला. व्हायरल व्हिडिओमधून स्क्रीनग्राब प्रदर्शित करताना, रिपोर्ट मध्ये स्पष्ट केले आहे की, “मध्य प्रदेशातून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिलांना थप्पड मारण्यात आली, लाथा मारल्या, केसांनी ओढले आणि काठीने मारहाण केली. आदिवासी स्त्रिया, ज्या चुलत बहिणी आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनी सार्वजनिक स्वरूपात छळ केला कारण त्या ज्यांच्याशी बोलत होत्या ते पाहून त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड राग आला … “

युपी मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी दोन दलित महिलांवर हल्ला केला
Screengrab from NDTV website

जुना व्हिडिओ, जात आधारित विषय नाही

आम्ही Google वर “MP,” “आदिवासी महिला,” “thrashed,” आणि “Talking cousins” हे कीवर्ड पाहिले, ज्यात जुलै 2021 पासून या घटनेचे अनेक रिपोर्ट निदर्शनास आले. 5 जुलै 2021 रोजीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अशाच एका अहवालात म्हटले आहे, “… दोन बहिणींवर धार येथे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मामेभावंडांशी फोनवर बोलण्याच्या कारणाने क्रूरपणे हल्ला केला. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी कारवाई करण्यास सांगितले आहे. धार एसपी आदित्य प्रताप सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, ही घटना इंदूरपासून सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यातील पीपलवा गावातील तांड्यावर घडली.

इंडिया टुडेने 4 जुलै 2021 रोजी दिलेल्या आणखी एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “तांडा पोलिस स्टेशनचे प्रभारी विजय वास्कले यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना 22 जून रोजी पिपलवा गावात घडली. हा व्हायरल व्हिडिओ 25 जून रोजी पोलिसांपर्यंत पोहोचला. तथापि, 19 आणि 20 वर्षे वयोगटातील पीडित महिलांना सुरुवातीला तक्रार नोंदवण्याची भीती वाटत होती. त्यानंतर एका महिलेला पोलिस ठाण्यात आणून तिचा जबाब नोंदवण्यात आला. तिने सांगितले की, त्यांच्या चुलत भाऊ आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी त्यांना गावातील शाळेजवळ थांबवले.”

घटनेचे तपशीलवार इतर रिपोर्ट येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात.

व्हिडिओ यूपीचा नाही, पोलिसांचे स्पष्टीकरण

याव्यतिरिक्त, आम्हाला 31 जानेवारी 2023 रोजी यूपी पोलिस फॅक्ट चेकने केलेले ट्विट देखील आढळले, ज्यात स्पष्ट केले होते की व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशचा नाही. ट्विटमध्ये टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टची लिंक आहे आणि त्यात म्हटले आहे की, “#FactCheck – हा व्हिडिओ उत्तर प्रदेशशी संबंधित नाही तर 2021, तांडा पोलिस स्टेशन, धार जिल्हा, मध्य प्रदेशशी संबंधित आहे. दिशाभूल करणाऱ्या ट्विट केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

युपी मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी दोन दलित महिलांवर हल्ला केला
Screengrab from tweet by UP Police Fact Check

Conclusion

अशा प्रकारे आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की मध्य प्रदेशातील धारमधील दोन महिलांना त्यांच्या मामेभावंडांशी फोनवर बोलल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून अमानुषपणे मारहाण केल्याचा एक जुना व्हिडिओ खोट्या संदर्भात शेअर केला जात आहे.

Result: False

Sources


Report By NDTV, Dated July 4, 2021
Report By Times Of India, Dated July 5, 2021
Report By India Today, Dated July 4, 2021
Tweet By UP Police Fact Check, Dated January 31, 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: [email protected]

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular