Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckPoliticsऔरंगजेब देशासाठी शहीद झाला, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानामागील नेमके सत्य काय...

औरंगजेब देशासाठी शहीद झाला, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानामागील नेमके सत्य काय आहे? ते जाणून घ्या

सोशल मीडियावर टीव्ही ९ मराठीची एक व्हिडिओ शेअर केली जात आहे. त्यात असा दावा केलाय की, इतिहासातील औरंगजेबासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की औरंगजेब देशासाठी शहीद झाला.

हा व्हिडिओ फेसबुकवर वेगवेगळ्या शीर्षकासहित शेअर केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा संबंध इतिहासातील मुघल सम्राट औरंगजेबाशी जोडला जात आहे. औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांवर ४० दिवस केलेले अत्याचार त्यांना असह्य झाले. त्यानंतर संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. उद्धव ठाकरेंनी त्याच औरंगजेबाचा उल्लेख शहीद असा केल्याचा दावा केला जात आहे.

फोटो साभार : NRT News
फोटो साभार : Harshal Bhagat

आमच्या न्यूजचेकरच्या (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स अॅप नंबरवर हाच दावा तथ्य पडताळणीसाठी दोन युजरने पाठवला होता.

व्हाट्स अॅप नंबरवर पाठवलेला दावा

Fact Check / Verification

औरंगजेब देशासाठी शहीद झाला, या उद्धव ठाकरेंच्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही टीव्ही ९ मराठीची ती मूळ व्हिडिओ पाहिली. ८ जून २०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये (संभाजीनगर) झाली होती. त्यावेळी त्यांनी केलेले संपूर्ण भाषण आम्ही ऐकले. या व्हिडिओत ४१:१४ सेकंदाला ठाकरे यांनी औरंगाजेबाचे विधान केले आहे.

त्यात औरंगजेब देशासाठी शहीद झाला, असे उद्धव ठाकरेंनी विधान केले. औरंगजेब सैनिक आपल्या देशासाठी शहीद झाला, असं त्यांनी म्हटले. मग आम्ही गुगलवर या संदर्भात माहिती शोधली. तेव्हा आम्हांला १८ जानेवारी २०१८ रोजीची क्विंट हिंदीची एक बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, भारतीय सेनेत ४४ राष्ट्रीय रायफलचे सैनिक होते. १४ जून २०१८ मध्ये ईद साजरी करण्यासाठी औरंगजेब घरी गेले असता काही आतंकवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह गुस्सु गावांत मिळाला. त्यांच्या डोक्यात आणि मानेवर गोळ्यांचे निशाण होते. 

फोटो साभार : Quint Hindi

उद्धव ठाकरेंनी भाषणात या शहीद झालेल्या औरंगजेब या सैनिकाचा उल्लेख केला आहे. या संदर्भात आम्हांला लाईव्ह हिंदुस्थान, लोकमत न्यूज यांच्या देखील बातम्या मिळाल्या. तसेच आम्हांला १५ जून २०१८ रोजी एएनआयने केलेले ट्विट मिळाले. त्या ट्विटमध्ये लिहिलंय,”पुंछच्या मेंढार येथील रायफलधारी औरंगजेबच्या घराबाहेर स्थानिकांनी ‘शहीद औरंगजेब अमर रहे’च्या घोषणा दिल्या. त्याचे अतिरेक्यांनी अपहरण केले होते आणि काल त्याचा मृतदेह पुलवामाच्या गुसू येथे सापडला होता. #JammuAndKashmir” 

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, उद्धव ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेल्या औरंगजेबाचा इतिहासातील मुघल सम्राट औरंगजेबाशी काहीही संबंध नाही. 

Conclusion 

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, उद्धव ठाकरेंनी भाषणातील उल्लेख हा जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या औरंगजेबाबद्दल आहे. त्याचा इतिहासातील दिल्लीच्या मुघल सम्राट औरंगजेब याच्याशी काहीही संबंध नाही. 

Result : Missing Context

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular