Wednesday, April 2, 2025

Politics

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील खरंच हे फोटो आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे

Written By Sandesh Thorve
May 5, 2022
banner_image

सोशल मीडियावर चार फोटो एकत्र करून ते शेअर केले जात आहे. त्यात असा दावा केलाय की, सदर फोटो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील आहे. 

त्यात पुढे असं म्हणलंय की, योगीकडून महाराष्ट्राला काहीही शिकण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेला नद्यांमध्ये गस चित्र दिसले नाही. 

व्हायरल मेसेज : 

“योगी” कडून आम्हाला काही शिकण्याची गरज नाही..

मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत म्हणूनच महाराष्ट्रातील

जनतेला नद्यामध्ये हे चित्र दिसले नाही.

बुद्धीचा अन प्लास्टिक सर्जरीचा दूरदूर पर्यंत सबंध नसतो हे आज पुन्हा एकदा दिसून आले…!!

#मुख्यमंत्रीआमचाअभिमान🚩

फेसबुकवर अनेक युजरने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याचे स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हातपंपाने पाणी पितांनाचा फोटो व्हायरल झाला होता. त्याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

Fact Check / Verification

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील ते फोटो आहेत की नाही, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ते फोटो काळजीपूर्वक पाहिले. 

व्हायरल झालेले फोटो

त्यात पहिल्या फोटोत एक श्वान मृतदेहाजवळ दिसत आहे. त्या फोटोवर अलामीचा वॉटरमार्क दिसत आहे. रिव्हर्स फोटोच्या मदतीने आम्ही तो फोटो शोधला. तेव्हा तो फोटो २० फेब्रुवारी २००८ रोजीचा अलामीवर आम्हाला आढळला. हा फोटो उत्तर प्रदेशातील वाराणसी घाटातील आहे, असं त्या फोटोच्या शीर्षकात लिहिले आहे. न्यूजचेकरने याची तथ्य पडताळणी गुजरातीमध्ये केली आहे.

दुसऱ्या फोटोत काही श्वान आणि कावळे नदीत दिसत आहे. रिव्हर्स फोटोच्या मदतीने आम्ही तो फोटो शोधला. गेटी इमेजवरून आम्हाला हा फोटो मिळाला. तो फोटो तिथे १४ फेब्रुवारी २०१५ पासून आहे.

भारतातील उन्नाव येथे १३ जानेवारी २०१४ रोजी परियारजवळ गंगा नदीत मानवी मृतदेह तरंगत होते. त्यांच्याभोवती श्वान आणि कावळे जमले आहेत, असं त्या फोटोच्या शीर्षकात लिहिले आहे. प्लॅनेट कस्टडियन या संकेतस्थळावर आम्हाला वाराणसी आणि गंगा नदीचे १९ ऑक्टोबर २०१५ रोजीचे काही फोटो आढळले. त्यात या फोटोचा समावेश आहे. तसेच न्यूजचेकरने हिंदीत याची तथ्य पडताळणी केली आहे.

तिसरा फोटोत अनेक मृतदेह दिसत आहे. तो फोटो गेटी इमेजवर २० मे २०२१ रोजी पासून आहे. मुसळधार पावसामुळे गंगेच्या काठावर मृतदेह बाहेर पडले, असं त्या फोटोच्या शिर्षकात लिहिले आहे. वॉशिंग्टन पोस्टने २४ मे २०२१ मध्ये कोरोनाच्या दरम्यान एक लेख लिहिला होता. त्यात हा फोटो वापरला आहे.

त्यातील चौथा फोटो अलामीवर ५ जून २०२१ रोजी पासून आहे. प्रयागराज येथे शनिवारी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त गंगा नदीच्या काठावर मृतदेहांच्या अवशेषांचे दृश्य, असं फोटोच्या शीर्षकात लिहिले आहे. डेक्कन हेरल्डने १७ जून २०२१ मध्ये एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी हा फोटो वापरला आहे. हा फोटो कोविड-१९ च्या काळातील आहे.

हे देखील वाचू शकता : पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्थानकावर तोडफोड करणाऱ्या तरुणांचा जुना व्हिडिओ व्हायरल

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, यातील शेवटचे दोन फोटो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील आहे. पण उरलेले दोन फोटो त्यांच्या कार्यकाळातील नाही. हे खूपच जुने फोटो असून ते भ्रामक दाव्यासोबत शेअर केले जात आहे.

Result : Misleading Content/Partly False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,631

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage