Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckPoliticsमुंबई विमानतळाचे मुख्यालय खरंच अहमदाबादला हलवले? चुकीचा दावा व्हायरल

मुंबई विमानतळाचे मुख्यालय खरंच अहमदाबादला हलवले? चुकीचा दावा व्हायरल

सोशल मीडियावर साम टीव्हीचा एक व्हिडिओ शेअर करत त्यात असा दावा केला जातोय की, मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवले.

अनिल कांबळे या फेसबुक युजरने हा व्हिडिओ शेअर पोस्टमध्ये लिहिलंय,”नवी मुंबई विमानतळाचे (हेडकॉटर) मुख्यालय गुजरातेतील अहमदाबादला….” हा व्हिडिओ अनेक युजर फेसबुकवर शेअर करत आहे.

फोटो साभार : Facebook/Anil Kamble
फोटो साभार : Facebook/Chetan Pravinrao Patil

ट्विटरवर देखील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

Fact Check / Verification

मुंबई विमानतळाचे मुख्यालय खरंच अहमदाबादला हलवले, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही यु ट्यूबवर “मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला” असं टाकून शोधले. तेव्हा आम्हांला साम टीव्हीच्या अधिकृत यु ट्यूब वाहिनीवरील ११ महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ मिळाला, जो आता व्हायरल झालेला आहे.

फोटो साभार : YouTube search

हा व्हिडिओ २० जुलै २०२१ रोजी साम टीव्हीच्या अधिकृत यु ट्यूब वाहिनीवर अपलोड केला होता. हा मूळ व्हिडिओ ४:३३ सेकंदाचा आहे.

फोटो साभार : YouTube/Saam TV

१३ जुलै २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या एबीपी माझाच्या बातमीनुसार, अदानी समूहाने गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा घेण्याची घोषणा केली. त्यानुसार अदानी समूहाचा यात ७४ टक्के हिस्सा होता. त्यातील ५० टक्के भागभांडवल जीव्हीके समूहाकडे तर उर्वरित २३.५ टक्के भागभांडवल भागीदार विमानतळ कंपनी दक्षिण आफ्रिका आणि बिडवेस्ट समूहाकडे राहिल.

या व्यतिरिक्त आम्हांला अदानी ग्रुपने २० जुलै २०२१ रोजी मुंबई विमानतळासंदर्भात केलेले एक ट्विट मिळाले. त्या ट्विटनुसार,”मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवण्याच्या अफवांसंबंधित आम्ही हे सांगू इच्छितो की, MIAL आणि NMIAL या दोन्ही विमानतळांचे मुख्यालय मुंबईतच राहतील. मुंबईला अभिमान वाटावा आणि आमच्या विमानतळाच्या इकोसिस्टीमच्या मदतीने हजारो नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार आहे.”

(मूळ इंग्रजी ट्विटचा मराठीत अनुवाद केला आहे)

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

तसेच आम्हांला २० जुलै २०२१ रोजी प्रकाशित झालेली मुंबई तकची बातमी मिळाली. त्या बातमीते देखील असं म्हटलंय की, मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार आहे, असं अदानी समूहाने स्पष्ट केलंय.

फोटो साभार : Mumbai Tak

हे देखील वाचू शकता : वेळ पडल्यावर शिवसेना पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर लढवणार, हे विधान खरंच संजय राऊत यांनी केलंय? याचे सत्य जाणून घ्या

या व्यतिरिक्त आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी देखील हेच सांगितले की, हा दावा चुकीचा आहे.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवल्याचा व्हायरल होणारा साम टीव्हीचा व्हिडिओ एक वर्षांपूर्वीचा असून त्यात केला जाणारा दावा चुकीचा आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच आहे.

Result : False

Our Sources

२० जुलै २०२१ रोजी अदानी ग्रुपने केलेले ट्विट

२० जुलै २०२१ रोजी प्रकाशित झालेली मुंबई तकची बातमी

फोनवरून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी झालेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular