Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckPoliticsमनसेचे निलेश माझिरे यांनी खरंच मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला ? याचे सत्य...

मनसेचे निलेश माझिरे यांनी खरंच मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला ? याचे सत्य जाणून घ्या

मनसेचे निलेश माझिरे यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, अशी बातमी टीव्ही ९ मराठीने २१ मे २०२२ रोजी दिली. त्याचबरोबर मनसेचे काही कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातम्या काही वृत्त माध्यमांनी दिल्या. 

टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, न्यूज १८ लोकमत या वृत्त वाहिन्यांनी निलेश माझिरे यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दलच्या बातम्या दिल्या होत्या. तसेच ई सकाळ, दिव्य मराठी, सरकारनामा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र न्यूज २४ यांनी देखील या संदर्भात बातम्या दिल्या होत्या. त्याचबरोबर टीव्ही ९ मराठी यांनी व्हिडिओच्या स्वरूपात बातम्या दिल्या होत्या. 

मागेही मनसेची औरंगाबादमध्ये सभा होती, त्यावेळी तिथे कलम १४४ लागू करण्यात आला, अशा बातम्या काही वृत्त वाहिन्यांनी दिल्या होत्या. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

Fact Check / Verification

मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, अशी बातमी टीव्ही ९ मराठीने दिली. याची पडताळणी करण्यासाठी आम्ही निलेश माझिरे यांचे फेसबुक खाते तपासले. तिथे निलेश माझिरे यांनी २० मे २०२२ रोजी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. “मी फेसबुकद्वारे सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगू इच्छितो की मी काही दिवसापूर्वी स्वारगेट येथील कबड्डी स्पर्धेमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी शिवसेनेचे सचिन आहेर साहेब आले होते, त्यांना मी गुच्छा देण्याचा व्हिडिओ व्हायरल काल रात्रीपासून जास्त प्रमाणात होतोय. पण माझं कुठेही असं स्टेटमेंट नाहीये की मी शिवसेनेत प्रवेश करतोय म्हणून मी वसंत तात्या मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाहीये. माझ्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना एवढंच सांगतो मी मनसेतच आहे.” असं निलेश माझिरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.  

फोटो साभार : Nilesh Mazire Mns

आम्ही त्या कबड्डी स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हांला समजले की, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने शिवसेना कसबा मतदार संघ व पुणे अ‌ॅमेच्युअर्स संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४८ वी कुमार कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा झाली. ही स्पर्धा २३ एप्रिल ते २८ एप्रिल २०२२ रोजी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. 

फोटो साभार : TV9 Marathi

निलेश माझिरे यांनी २१ मे २०२२ रोजी पुन्हा एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यात लिहिले होते की, मी आणि वीस कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार, ही बातमी खोटी आहे. 

फोटो साभार : Nilesh Mazire Mns

त्यानंतर २२ मे २०२२ रोजी निलेश माझिरे यांनी फेसबुक लाईव्ह केले. त्यात त्यांनी सांगितले,”मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. दोन दिवस झाले मीडियात हे वावड्या सगळ्या उठतायेत, त्या सगळ्या खोट्या आहे.”

फोटो साभार : Nilesh Mazire Mns

या व्यतिरिक्त आम्हांला २० मे २०२२ रोजी महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केलेली एक बातमी मिळाली. 

फोटो साभार : Maharashtra Times

त्याचबरोबर आम्ही मनसेचे निलेश माझिरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी न्यूजचेकरला सांगितले,”काही वृत्तवाहिन्यांनी मी २० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाणार, अशा बातम्या दाखवल्या. त्यावेळी माझे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले. मी स्वतः त्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. मला मनसेचे दुसरे पद देखील मिळेल, असं पक्ष श्रेष्ठींनी सांगितले. पण त्याबाबत अजून मला अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी शिवसेनेत जाणार आहे, असं स्वतः कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही. मी मनसेतच आहे. बातम्यांमध्ये मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या सगळ्या बातम्या खोट्या आहे.”

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, निलेश माझिरे यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी देखील खोटी आहे. निलेश माझिरे यांनी स्वतः कुठेही या संबंधितचे स्टेटमेंट दिलेलं नाही.

Result : Misleading Content/Partly False

Our Sources

२० मे, २१ मे आणि २२ मे २०२२ रोजी निलेश माझिरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट

२० मे २०२२ रोजी महाराष्ट्र टाइम्स यांनी प्रकाशित केलेली बातमी

२३ मे २०२२ रोजी निलेश माझिरे यांच्याशी झालेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular