Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact CheckPoliticsनुपूर शर्माचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आताचा सांगत शेअर केला जातोय, जाणून घ्या...

नुपूर शर्माचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आताचा सांगत शेअर केला जातोय, जाणून घ्या याचे सत्य काय आहे

(याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख शुभम सिंह याने लिहिला आहे.)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, वादग्रस्त विधानानंतर नुपूर शर्माचा अजून एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्माने तिहेरी तलाक, दहशतवाद्यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय उघडण्यासारख्या मुद्द्यांवर ती आपली मते मांडताना दिसत आहे. 

ट्विटरवर काही युजर हा व्हिडिओ नुपूर शर्माचे आताचे विधान असल्याचे सांगत शेअर करत आहे. 

फोटो साभार : Twitter@Brand_rajat_

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता. 

फेसबुकवर देखील युजर हा व्हिडिओ नुपूर शर्माचे आताचे विधान असल्याचे सांगत शेअर करत आहे. 

फोटो साभार : Facebook/Ajay Mishra

या व्यतिरिक्त यु ट्यूबवर देखील सनातन योद्धा नावाच्या वाहिनीने हा व्हिडिओ १५ जुलै २०२२ रोजी अपलोड केला आहे.

फोटो साभार : YouTube/Sanatan Youth

मे २०२२ मध्ये नुपूर शर्माने एका टीव्ही कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अरब देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून आपला विरोध व्यक्त केला होता. भाजपाने याप्रकरणी कारवाई करत नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. भारतामध्ये विविध ठिकाणी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्या गेल्या. नुपूर शर्मा यांच्या विविध राज्यात दाखल केलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. 

लाईव्ह लॉनुसार, सर्वोच्च न्यायालयाने १ जुलैला या प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले की, शर्मा यांच्या विधानाने संपूर्ण देशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुपूरच्या अर्जावर विचार करण्यास नकार दिला, त्यानंतर तिला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. 

त्याचवेळी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना नुपूरच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिले. हिंदुस्थानच्या बातमीनुसार, न्यायालयाने एक नोटीस जारी करत केंद्र आणि राज्यांना विचारले की, नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या सर्व केस एकाच ठिकाणी स्थलांतरित केले जावे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जातोय की, वादग्रस्त विधानानंतर नुपूर शर्मा यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. 

Fact Check / Verification

दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्ड गुगलवर टाकून शोधले. पण आम्हांला या संदर्भात कोणतीही बातमी मिळाली नाही, ज्यात नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानानंतर नव्या विधानाबाबत माहिती मिळू शकेल. या व्यतिरिक्त आम्ही नुपूर शर्माच्या फेसबुक आणि ट्विटर खात्यावर जवळपास एक महिन्यांपासून कोणतेही ट्विट केलेले नव्हते. 

त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओ पुन्हा बारकाईने पाहिला. व्हिडिओत ३३ व्या सेकंदाला व्यासपीठावर नुपूर शर्मा यांच्या मागे एका खुर्चीजवळ ‘श्री प्रशांत मोहोळे’ असं लिहिलेले दिसले. आम्ही ‘प्रशांत मोहोळे’ हर गुगलवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला वनवासी कल्याण आश्रमशी निगडित बातमी मिळाली. या बातम्यांमध्ये प्रशांत मोहोळे यांचा उल्लेख महाराष्ट्रातील अहमदनगर येथील वनवासी कल्याण आश्रमाचे शहराध्यक्ष म्हणून केला होता. 

फोटो साभार : YouTube/Sanatan Youth

ही पडताळणी करत असताना न्यूजचेकरने जनजाती कल्याण आश्रमाच्या फेसबुक पानावर दिलेल्या एका नंबरवर संपर्क साधला. तिथे काम करणारे जितेंद्र अग्रवाल यांनी आम्हांला व्हायरल व्हिडिओ पाठवला. त्यांनी आम्हांला सांगितले,”हा व्हिडिओ आताचा नाही. तो जवळपास चार वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी नुपूर शर्मा आमच्या येथील एका स्मृती समारंभात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी व्याख्यान दिले होते. ही व्याख्यानमाला गेल्या १२ वर्षांपासून आयोजित केली जात आहे. त्यावेळी या कार्यक्रमात भाजपाच्या प्रवक्ता नुपूर शर्मा आणि राज्यसभेचे खासदार सुधांशु त्रिवेदी हे उपस्थित होते.”

यावरून हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ आताचा नसून चार वर्षांपूर्वीचा आहे. त्यानंतर आम्ही ‘नुपूर शर्मा वनवासी कल्याण आश्रम’ हे कीवर्ड ट्विटरवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला नुपूर शर्मा यांनी २५ मे २०१८ रोजी केलेले एक ट्विट मिळाले. ट्विटमध्ये नुपूर शर्माने लिहिलंय की, त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘राष्ट्रवादातील महिला’ या विषयावर व्याख्यान दिले. 

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता. 

नुपूर शर्मा यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी जे कपडे घातले आहे, तेच व्हायरल व्हिडिओमध्ये देखील दिसत आहे. या व्यतिरिक्त आम्हांला नुपूर शर्मा यांच्या ट्विटवरून मिळालेल्या माहितीनुसार, ‘वनवासी कल्याण आश्रम, नगर कै. ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला’ हा कीवर्ड गुगलवर टाकून शोधला. तेव्हा आम्हांला ‘शिवशक्ती संगम’ नावाच्या फेसबुक पानाने २४ मे २०१८ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओत व्हायरल व्हिडिओतील काही भाग पाहिला जाऊ शकतो. 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, नुपूर शर्मा यांचा व्हायरल व्हिडिओ जवळपास चार वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा नुपूर शर्मा महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये वनवासी कल्याण आश्रमाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात व्याख्यान देत होत्या.

Result : False

Our Sources

२० जुलै २०२२ रोजी फोनवरून वनवासी कल्याण आश्रमाचे जितेंद्र अग्रवाल यांच्याशी झालेला संवाद

२५ मे २०१८ मधील नुपूर शर्मा यांचे ट्विट

२४ मे २०१८ मधील शिवशक्ती संग्रामने अपलोड केलेली फेसबुक व्हिडिओ

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular