Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckPoliticsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंच औरंगजेबाच्या मुलाच्या थडग्यावर फुले अर्पण केली? याचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंच औरंगजेबाच्या मुलाच्या थडग्यावर फुले अर्पण केली? याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत आहे. त्यातील पहिल्या फोटोत अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगजेबाच्या थडग्यावर फुल अर्पण करत आहे आणि दुसऱ्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगजेबाच्या मुलाच्या थडग्यावर फुल अर्पण करत आहे, असा दावा केला जात आहे.

फेसबुकवर अनेक युजरने हा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट फेसबुकवर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्याचे स्क्रिनशॉट खाली जोडत आहे. 

फोटो साभार : Facebook Post

काही दिवसांपूर्वी अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादमधील दर्ग्यात गेले होते. तिथे त्यांनी औरंगजेबाच्या थडग्यावर फुले अर्पण केली. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगजेबाच्या मुलाच्या थडग्यावर फुले अर्पण केली, असा दावा केला जात आहे.

Fact Check / Verification

दावा क्रमांक १ : अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या थडग्यावर फुल अर्पण करत आहे ?

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर रिव्हर्स फोटोच्या मदतीने शोधला.

फोटो साभार : Google Search Result

तेव्हा आम्हांला अकबरुद्दीन ओवेसी यांनी १२ मे २०२२ रोजी ट्विट केलेली एक पोस्ट मिळाली. त्यात ते औरंगाबादच्या दर्ग्यात औरंगजेबाच्या थडग्यावर फुल अर्पण करताना दिसत आहे.

(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे जोडत आहे)

दावा क्रमांक २ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगजेबाच्या मुलाच्या थडग्यावर फुल अर्पण केली ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगजेबाच्या मुलाच्या थडग्यावर फुल अर्पण केले, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्याची माहिती गुगलवर शोधली. तेव्हा आम्हांला इंडियन कल्चर या संकेतस्थळावर बहादूर शाह जाफर यांची मिळाली.

फोटो साभार : Google Search Result

इंडियन कल्चर या संकेतस्थळावर बहादूर शाह जाफर याच्याबद्दल लिहिले होते की, बहादूर शाह जाफर हे सम्राट अकबर शाह II यांचा मुलगा आहे. यावरून हे स्पष्ट होते की, बहादूर शाह जाफर हा औरंगजेबाचा मुलगा नाही.

फोटो साभार : Indian Culture

त्यानंतर आम्ही गुगलवर रिव्हर्स इमेज करून तो फोटो शोधला. तेव्हा आम्हांला ७ सप्टेंबर २०१७ रोजीचे पीआयबी इंडियाचे एक ट्विट सापडले. त्यात लिहिलंय,”यंगूनमधील शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या मजार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी.” #IndiaMyanmar

(इंग्रजी ट्विटर पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)

(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे जोडत आहे)

त्यानंतर आम्हांला ट्विटरवर पीएमओ इंडिया यांच्या अधिकृत खात्यावर देखील ७ सप्टेंबर २०१७ रोजीची हीच पोस्ट मिळाली. त्यात लिहिले होते,”यंगूनमधील शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या मजार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी.”

(इंग्रजी ट्विटर पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)

(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे जोडत आहे)

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगजेबाच्या थडग्यावर फुल अर्पण करत आहे, हा केला जाणारा दावा खरा आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगजेब याच्या मुलाच्या थडग्यावर नाही तर म्यानमारमधील बहादूर जाफर शाह यांच्या मझारवर फुल अर्पण करत आहे.

Result : Misleading Content/Partly False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular