Authors
(याची मूळ तथ्य पडताळणी न्यूजचेकर हिंदीने केली आहे आणि हा लेख Arjun Deodia याने लिहिला आहे)
सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या करणारा आरोपी गोल्डी ब्रार हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे मित्र आहे. व्हायरल फोटोत गोल्डी ब्रार नावाच्या एका व्यक्तीची ट्विटर पोस्ट दिसत आहे. त्या पोस्टमध्ये एक फोटो दिसत आहे, ज्यात एका व्यक्तीसोबत भगवंत मान दिसत आहे. पोस्टमध्ये लिहिलंय,”अभिनंदन सीएम साहेब.”
(इंग्रजी ट्विटर पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)
(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे जोडत आहे)
फेसबुक आणि ट्विटरवर हा फोटो खूपच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या फोटोच्या आधारे भगवंत मान आणि आम आदमी पार्टीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे की, सिद्धू मूसेवालाची हत्या करणारा आरोपी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे.
२९ मे २०२२ रोजी सिद्धू मूसेवालाची पंजाबीमधील मानसामध्ये अज्ञात लोकांनी गोळी घालून हत्या केली. हत्या झाल्यानंतर बातमी आली की, सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली आहे.
गोल्डी ब्रार हा तिहार कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिष्णोई नावाच्या एका दुसऱ्या गँगस्टरच्या जवळचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात केलाय की सिद्धू मूसेवालाची हत्या करणारा आरोपी गोल्डी ब्रार हा मुख्यमंत्री मान यांचे मित्र आहे.
Fact Check/Verification
सर्वात आधी आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, व्हायरल फोटोत दिसणारी फेसबुक पोस्ट नेमकी कुठून आली आहे. हे शोधल्यावर आम्हांला गोल्डी ब्रार नावाच्या व्यक्तीचे फेसबुक खाते मिळाले. तिथून १० मार्च रोजी व्हायरल फोटो शेअर केला होता.
याच फेसबुक खात्यावरून गोल्डी ब्रार याने रविवारी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, माझा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो सोशल मीडियावर चुकीच्या अर्थाने वापरला जात आहे. त्यांनी यात स्पष्ट सांगितले की, मी सिद्धू मूसेवालाची हत्या करणारा आरोपी गोल्डी ब्रार नाहीये. कोणीतरी एकाच नावाचे व्यक्ती समजून माझा फोटो चुकीच्या पद्धतीने शेअर केला आहे. मी पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील जांडवाला गांवचा आहे, असे त्यांनी व्हिडिओत सांगितले.
या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही गोल्डीचे भाऊ नवी कंबोज यांच्याशी संवाद साधला. त्यांनीही व्हायरल दावा चुकीचा असल्याचे सांगितले. नवी म्हणाले की, गोल्डीने पंजाबच्या आम आदमी पार्टीसाठी काम केले होते. गोल्डीने व्हायरल फोटो पंजाब विधानसभेच्या निकालाच्या दिवशी शेअर केला होता, जेव्हा भगवंत मान यांचे मुख्यमंत्री होणे निश्चित झाले होते.
त्याचबरोबर काही माध्यम समूहांनी देखील या व्यक्तीचा फोटो मूसेवालाचा खरा आरोपी गोल्डी ब्रार सांगत बातम्यांमध्ये वापरला आहे. हा फोटो इंडिया टुडे आणि एनडीटीव्ही यांच्या बातम्यांमध्ये वापरला आहे. या बातम्यांमध्ये असलेला गोल्डी ब्रारचा फोटो आणि व्हायरल फोटोत दिसणारा गोल्डी ब्रारचा चेहरा यात खूपच अंतर आहे. हे दोन्ही वेगवेगळे व्यक्ती आहे.
या व्यतिरिक्त न्यूजचेकरने पंजाबच्या आम आदमी पार्टीचे मुख्य प्रवक्ते मलविंदर सिंह कंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे देखील हेच म्हणणे होते की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत दिसणारा व्यक्ती गोल्डी ब्रार नाही.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, कोणीतरी दुसराच व्यक्ती सिद्धू मूसेवालाची हत्या करणारा आरोपी आणि त्याची जबाबदारी घेणारा व्यक्ती गोल्डी ब्रार सांगत दिशाभूल केली जात आहे.
Result : False Context/False
Our Sources
२९ मे २०२२ रोजी गोल्डी ब्रारने अपलोड केलेली फेसबुक पोस्ट
२९ मे २०२२ रोजी इंडिया टुडेने प्रकाशित केलेली बातमी
न्यूजचेकरने केलेले फोटोचे विश्लेषण
फोनवरून पंजाबच्या आम आदमी पार्टीचे मुख्य प्रवक्ते मलविंदर सिंह कंग यांच्याशी झालेला संवाद
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.