Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानाविरोधात कतारसहित अन्य अरब देशांनी नाराजी व्यक्त केल्याने भाजपावर टीका होत आहे. टीका करणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, मोदी सरकार आणि भाजपाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव बदनाम केले. पण सोशल मीडियावर एका बातमीच्या स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले की, मोदी सरकार मुत्सद्दी मार्गाने प्रश्न सोडवताना दिसत आहे आणि त्याचे परिणामही दिसून येत आहे.
व्हायरल स्क्रिनशॉट एका बातमीचा आहे. त्याच्या शीर्षकात लिहिलंय,”राजनैतिक संकटात सौदी अरेबिया, बहरीनने कतार एअरवेजचा परवाना रद्द केला.” सोशल मीडियावर ही बातमी आताची असल्याचे सांगितले जात आहे. त्यात म्हटलंय की, पैगंबर मोहम्मद यांच्या घटनेमुळे भारतावर टीका करणे, कतारला महागात पडले. युजर ही बातमी फेसबुक आणि ट्विटरवर शेअर करत टोमणा देतायेत की, पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्देगिरीने कतार एअरवेजचा परवाना रद्द झालाय.
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे माजी मीडिया सेलचे प्रमुख नवीन जिंदल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. या विधानावर अनेक अरब देशांनी आक्षेप घेत आपला विरोध नोंदवला.
या प्रकरणी कतारने आपल्या देशातील भारतीय राजदूताला बोलावून घेतले. याला प्रतिसाद म्हणून भाजपाच्या समर्थकांनी ट्विटरवर #BoycottQatarAirways या ट्रेंडची सुरवात केली. त्यातच आता पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्देगिरीने कतार एअरवेजचा परवाना रद्द झालाय, या बातमीचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची आधी हिंदीत तथ्य पडताळणी झाली आहे.
Fact Check/Verification
पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्देगिरीने कतार एअरवेजचा परवाना रद्द झालाय, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही व्हायरल स्क्रिनशॉटमधील बातमीचे शीर्षक गुगलवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला इंडिया टीव्हीची एक बातमी मिळाली. त्या बातमीचे शीर्षक अगदी असेच होते. ही बातमी ७ जून २०१७ रोजी प्रकाशित झाली होती. व्हायरल होणारा बातमीचा फोटो हा पाच वर्षांपूर्वीचा आहे.
इंडिया टीव्हीच्या बातमीनुसार, त्यावेळी सौदी अरेबिया, युएई, इजिप्त, बहरीन आणि यमन या देशांनी कतारवर राजनैतिक निर्बंध लादले होते. या देशांनी आरोप केला होता की, कतार अतिरेक्यांना पाठिंबा देत आहे. या प्रकरणाबाबत त्यावेळी अनेक बातम्या छापल्या होत्या. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये कतार आणि नाराज असलेल्या अरब देशांमध्ये एक करार झाला. त्यानंतर या देशांमध्ये पुन्हा कतार एअरवेजची उड्डाणे सुरू करण्यात आली.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, कतार एअरवेजचा परवाना रद्द होण्याचा आणि या बातमीचा पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानाच्या घटनेशी कोणताही संबंध नाही. ही बातमी पाच वर्षांपूर्वीची आहे आणि ती आताची सांगून शेअर केली जात आहे.
(या तथ्य पडताळणीचे न्यूजचेकर मराठीने हिंदीतून अनुवाद केला आहे.)
Result : False Context/Missing Context
Our Sources
७ जून २०१७ रोजी इंडिया टीव्हीची प्रकाशित झालेली बातमी
१० जानेवारी २०२१ रोजी हिंदुस्थान टाइम्सची प्रकाशित झालेली बातमी
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Komal Singh
January 10, 2025
Prasad S Prabhu
May 25, 2024
Runjay Kumar
May 20, 2024