Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर झाले मराठी विरोधी आंदोलन.
संबंधित व्हिडीओ AI तंत्राचा वापर करून बनविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मराठी सक्तीच्या मुद्द्याने सध्या जोर धरला आहे. बँका आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी बोलणे तसेच फलक लावण्यावरून मनसेची आंदोलने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर “आम्ही मराठी बोलत नाही”, “आम्हाला गद्दार घोषित करा” असे इंग्रजी भाषेतील फलक हातात घेऊन मराठी विरोधी आंदोलन झाल्याचे हा दावा सांगतो.
फेसबुकवर मिळालेल्या दाव्याच्या कॅप्शनमध्ये, “महाराष्ट्रात रहायचं आहे, कमवायच आहे, इथल्या सोयीसुविधा उपभोगायच्या आहेत पण इथल्या भाषेला मात्र उघड विरोध, हे फलकधारी उद्या परदेशात गेले तर इंग्रजी,फ्रेंच,जर्मन शिकतील. पण यांना आपल्याच देशाची भाषा शिकायला त्रास होतोय.”
हाच दावा आम्हाला X वरही आढळला.
व्हायरल दाव्यामध्ये सांगितल्याप्रमाणे “मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर झाले मराठी विरोधी आंदोलन” ही बाब खरी आहे का? हे शोधण्यासाठी संबंधित कीवर्डस Google वर शोधले. मात्र आम्हाला यासंदर्भात कोणत्याच अधिकृत माध्यमाने वृत्त प्रसिद्ध केले असल्याचे दिसले नाही. जर मुंबईत असे आंदोलन झाले असते तर त्याच्या मोठ्या बातम्या आल्या असत्या.
यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढल्या आणि त्या Google वर शोधल्या मात्र त्याबद्दल कोणतीच माहिती मिळू न शकल्याने संबंधित व्हिडीओ AI असल्याचा संशय आम्हाला आला. खात्री करून घेण्यासाठी आम्ही wasitai या AI जनरेटेड Image शोधणाऱ्या टूलवर आम्ही की फ्रेम्स शोधल्या.
आम्ही सर्वप्रथम हातात ‘LEBEL US’ अशी प्रतिमा घेतलेली किफ्रेम शोधली. सदर इमेज AI तंत्राचा वापर करून बनविलेली असल्याचे आम्हाला निदर्शनास आले. संबंधित इमेज आणि त्यावर wasitai ने दिलेले निकाल खाली पाहता येतील.
खाली दाखविल्याप्रमाणे आम्ही आणखी एक इमेज wasitai वर तपासली असता समान परिणाम हाती आले.
व्हिडिओच्या किफ्रेम्स AI जनरेटेड असल्याची खात्री झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला असता व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यात ‘PARIBHRAMAN’ असा वॉटरमार्क असल्याचे आम्हाला दिसले. त्यावरून संबंधित कीवर्डस शोधल्यावर आम्हाला paribhraman नावाचे एक Instagram खाते सापडले. ते शोधताना आम्हाला संबंधित खात्यावर व्हायरल व्हिडीओ ९ एप्रिल २०२५ रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे दिसून आले.
“भारत हा भाषिकदृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण देश आहे, संविधानाच्या आठव्या अनुसूची अंतर्गत २२ अधिकृतपणे मान्यताप्राप्त भाषा आणि एकूण १२१ भाषा आणि २७० मातृभाषा आहेत. सर्व भाषांचा आदर करा.” अशी मूळ इंग्रजी भाषेतील कॅप्शन देताना संबंधित युजरने एक अस्वीकरण दिले असून संपूर्ण पोस्ट AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट केल्याचे आम्हाला आढळले. “DISCLAIMER : Entire content in this video is AI GENERATED” अशा अस्वीकरणामुळे व्हायरल व्हिडीओ AI जनरेटेड असल्याची खात्री झाली.
अधिक तपासासाठी आम्ही संबंधित व्हीडिओ DAU (Deepfakes Analysis Unit) ज्याचा Newschecker सुद्धा एक भाग आहे, कडे पाठविले. संबंधित युनिटने पडताळणी करून आम्हाला रिपोर्ट दिला. “आम्ही हा व्हिडिओ Hive इमेज क्लासिफायरमधून चालवला आणि खालील निकाल मिळाला. ०:०७ ते ०:१२ आणि नंतर ०:१७ च्या सुमारास जनरेटिव्ह एलिमेंट्समध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली आणि त्या दोन्ही घटनांमध्ये, ‘SORA’ ला संभाव्य गुन्हेगार म्हणून ध्वजांकित केले गेले आहे.” तसेच “येथील प्रतिमा व्हिडिओमधील दृश्यमान विसंगती अधोरेखित करतात. स्पेलिंगच्या चुका, चुकीच्या पद्धतीने जुळवलेले हातपाय आणि वास्तुशिल्पातील विसंगती हे एआय दोषी असल्याचे संकेत आहेत.” अशी माहिती आम्हाला मिळाली. संबंधित संस्थेकडून उपलब्ध रिपोर्टचे स्क्रीनशॉट्स खाली पाहता येतील.
यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल व्हिडीओ AI तंत्राचा वापर करून बनविण्यात आलेला आहे. न्यूजचेकरने HIVE Moderation वर सुद्धा व्हायरल व्हिडीओ चालविला असता मिळालेले व्हिडीओ AI तंत्राचा वापर केला असल्याचे निकाल खाली पाहता येतील.
अशाप्रकारे आमच्या तपासात स्पष्ट झाले की, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर मराठी विरोधी आंदोलन झाले असे सांगणारा व्हिडीओ AI तंत्राचा वापर करून बनविण्यात आला आहे.
Our Sources
Google Search
Analysis on Wasit AI
Analysis on DAU(Deepfakes Analysis Unit)
Analysis on Hive Moderation
Vasudha Beri
June 19, 2025
Kushel Madhusoodan
June 18, 2025
Runjay Kumar
June 18, 2025