Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
वायनाडमध्ये राजीव गांधींच्या पुण्यतिथीला केले राहुल गांधींचे फोटोपुजन.
हा फोटो तिरुपूर पंचायतीमध्ये ओणम उत्सवादरम्यान शेतकरी काँग्रेसने आयोजित केलेल्या ओणम बाजाराच्या उद्घाटनाचा आहे.
भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी २१ मे रोजी झाली. यानिमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना ठिकठिकाणी वंदन केले. त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल होत असतानाच वायनाडमध्ये राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधींचे फोटोपुजन करण्यात आले, असा दावा केला जात आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“स्थळ: वायनाड, केरळ. स्थळ: जिल्हा काँग्रेस समितीचे कार्यालय. प्रसंग: राजीव गांधी यांची पुण्यतिथी. तात्पर्य : १००% साक्षरता असलेल्या राज्यात, या “शिकलेल्या” मूर्खांना हे देखील माहित नाही की बाप कोण आणि पोरगा कोण, किंवा जिवंत आहे आणि कोण मेलाय” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
न्यूजचेकरला आमची व्हाट्सअप टिपलाइन (+91 9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून सत्यता तपासण्याची विनंती केली आहे.
व्हायरल दाव्यातील कॅप्शननुसार केरळ मधील वायनाड येथे काँग्रेस समितीच्या कार्यालयात वायनाडमध्ये राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधींचे फोटोपुजन करण्यात आले असे सांगण्यात आले आहे. दरम्यान आम्ही असे खरेच घडले आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात आम्ही कीवर्ड सर्च करून पाहिले मात्र अशी घटना घडल्याचे सांगणारे कोणतेच न्यूज रिपोर्ट आढळले नाही.
काहीच माहिती न मिळाल्याने संबंधित फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च केला. मात्र आम्हाला संबंधित फोटोचा वापर करून करण्यात आलेल्या समान पोस्ट मिळाल्या मात्र फोटोचा मूळ स्रोत उपलब्ध झाला नाही.
दरम्यान आम्ही न्यूजचेकर मल्याळम टीमच्या माध्यमातून वायनाड मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क साधला, फोटोत दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करताना नेयट्टिंकारा येथील रहिवासी आणि तिरुवनंतपुरम डीसीसीचे सरचिटणीस विनोद सेन या फोटोत दिसत असल्याचे स्पष्ट झाले.
आम्ही फोटोत दिसणाऱ्या विनोद सेन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या फोटोबद्दल सांगितले: “हा तिरुवनंतपुरममधील नेयट्टिंकारा मतदारसंघातील फोटो आहे. फोटोत आपण स्वतः आणि एस. के अशोक कुमार आहे. आपण स्वतः मी तिरुवनंतपुरम डीसीसीचा सरचिटणीस आहे, तर एस. के अशोक कुमार त्यावेळी केपीसीसीचे सचिव होते. दरम्यान मूळ फोटो आता उपलब्ध नाही.”
“हा फोटो तिरुपूर पंचायतीमध्ये ओणम उत्सवादरम्यान शेतकरी काँग्रेसने आयोजित केलेल्या ओणम बाजाराच्या उद्घाटनाचा आहे. फोटोमध्ये मी दीपप्रज्वलन करीत आहे. एस. के अशोक कुमार यांनी दीप प्रज्वलित करून ओणम बाजाराचे उद्घाटन केल्यानंतर, मीही दिप लावला. तिरुपूर शेतकरी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मित्रम लालू हे राहुल गांधींचे कट्टर चाहते आहेत. त्यांनीच तिथे उद्घाटनाच्या वेळी त्यांचा हा फोटो लावला होता” असे विनोद सेन पुढे म्हणाले.
आम्ही विनोद सेन यांचे फेसबुक प्रोफाइल तपासले तेंव्हा लक्षात आले की फोटोमध्ये तेच आहेत.
फोटोमध्ये अशोक कुमार बाजूला तोंड करून उभे आहेत, त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नाही. तथापि, त्यांच्या शरीराची रचना फोटोतील व्यक्तीसारखीच आहे.
तिरुपूर पंचायतीमध्ये ओणम उत्सवादरम्यान शेतकरी काँग्रेसने आयोजित केलेल्या ओणम बाजाराच्या उद्घाटनादरम्यानचा फोटो खोटा दावा करून व्हायरल करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
अशाप्रकारे आमच्या तपासात वायनाडमध्ये राजीव गांधींच्या पुण्यतिथीला केले राहुल गांधींचे फोटोपुजन हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Google Search
Quote from Vinod Sen, Thiruvananthapuram DCC General Secretary
Facebook Profile of Vinod Sen
Facebook Profile of S K Ashok Kumar
(Inputs by Sabloo Thomas, Newschecker Malyalam)
Runjay Kumar
July 8, 2025
Prasad S Prabhu
June 24, 2025
Prasad S Prabhu
May 24, 2025