Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) ७ सप्टेंबरला सुरुवात होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत.हे पाहता भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची (Rahul Gandhi) लोकप्रियता पंतप्रधान मोदींपेक्षा (Narendra Modi) जास्त झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.आजतक वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणाच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला आहे.


हे स्क्रिनशॉट्स पाहता देशातील ५२ टक्के लोक राहुल गांधींना पसंत करतात,तर पीएम मोदी ४६ टक्क्यांवर आहेत.हे शेअर करताना यूजर्स लिहित आहेत की भारत जोडो यात्रेला देशाचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.
दिल्ली काँग्रेसच्या व्हेरिफाईड ट्विटर हँडलवरूनही ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.पोस्टमध्ये लिहिले आहे की,“देशाचा मूड बदलत आहे,आता जनतेने वक्तृत्ववादाला धडा शिकवण्याचे ठरवले आहे”.त्याचप्रमाणे फेसबुक आणि ट्विटरवरही अनेकांनी हे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
काही कीवर्डच्या साहाय्याने सर्च केल्यावर आम्हाला आज तकच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ सापडला.२४ जानेवारी २०१९ रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ आजतकच्या ‘मूड ऑफ द नेशन’नावाच्या सर्वेक्षणावर आधारित आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी आजतकने हे सर्वेक्षण केले आहे.लोकसभा निवडणुकीत कोणाचे सरकार बनू शकते आणि देशातील लोक पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंत करतात,याचा अंदाज ‘आजतक’ने सर्व्हेद्वारे लावला होता.
आजतकच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये ७ मिनिटे ५६ सेकंदांवर ग्राफिकच्या मदतीने ४६ टक्के लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी पसंत असल्याचे दाखवले जात आहे.या श्रेणीतील सर्वेक्षणात ३४ टक्के लोकांनी आपली निवड राहुल गांधींना सांगितली होती. त्याच वेळी,२३ मिनिटे २९ सेकंदांवर या व्हिडिओमधील आणखी एक ग्राफिक दर्शविते की ५२% लोक विरोधी नेत्यांच्या श्रेणीत मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधींना पसंत करतात.हे दोन्ही ग्राफिक्स हुबेहुब व्हायरल पोस्टमध्ये दाखवलेल्या ग्राफिकसारखे दिसत आहेत.


या व्यतिरिक्त इंडिया टुडे वेबने २७ जानेवारी २०१९ रोजी या सर्वेक्षणाबाबत बातमीही प्रकाशित केली होती.या बातमीत असेही सांगण्यात आले आहे की,४६ टक्के लोक नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पसंत करतात.तसेच ५२% विरोधी नेते राहुल गांधी यांना पसंत करतात. त्यावेळी आजतकच्या ट्विटर हँडलवर या सर्वेक्षणाचे अनेक व्हिडिओही ट्विट करण्यात आले होते. खालील व्हिडिओवरून संपूर्ण गोष्ट स्पष्ट होते.
एकंदरीत, व्हायरल पोस्टमध्ये दाखवलेल्या डेटाचा भारत जोडो यात्रेशी काहीही संबंध नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हे सर्वेक्षण तीन वर्षांहून अधिक जुने आहे. यासोबतच हे दोन्ही आकडे वेगवेगळ्या श्रेणीतील आहेत. या माध्यमातून राहुल गांधींची लोकप्रियता पीएम मोदींपेक्षा जास्त आहे किंवा होती असे म्हणणे चुकीचे ठरेल. नरेंद्र मोदींचा आकडा देशाच्या पंतप्रधानांसाठी पहिल्या पसंतीच्या श्रेणीत आहे, तर राहुल गांधींचा आकडा विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आवडत्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारांच्या श्रेणीत अव्वल आहे.
Our Sources
YouTube Video of AajTak, uploaded on January 24, 2019
Report of India Today, published on January 27, 2019
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
November 29, 2025
JP Tripathi
November 25, 2025
Vasudha Beri
November 19, 2025