Authors
देशभरात सध्या गाजत असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आणि सोशल मीडियावर विविध पोस्ट चा पाऊस पडू लागला. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन चालल्याची पोस्टही अशीच व्हायरल झाली. गोपीनाथ मुंडे हे एक ज्येष्ठ नेते होते त्यामुळे भाजप चे असले तरी राहुल गांधी यांनी त्यांची प्रतिमा आपल्या हाती घेतली. राहुल गांधी राजकारणाच्या पलीकडील नाते जपत आहेत. राजकारण गेलं खड्ड्यात राहुल गांधी यांचे कौतुक करावे तितके कमी अश्या पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्राम वर पाहायला मिळाल्या. व्हाट्सअप सारख्या माध्यमांवरही ही पोस्ट पसरू लागली होती.
“राजकारण गेलं खड्ड्यात पण माणूस म्हणून आपण मन जिंकला राहुल जी तुम्ही” अशी कॅप्शन वाचायला मिळाली.
Fact Check/Verification
आम्ही हा फोटो खरा आहे का? हे पाहण्यासाठी राहुल गांधी, भारत जोडो यात्रा आणि गोपीनाथ मुंडे फोटो राहुल गांधी यासारखे किवर्ड सर्च करून पाहिले असता, मूळ फोटोमध्ये आम्हाला काहीतरी गडबड करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. यासाठी आम्ही या फोटोचा गुगल वर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला असता, मूळ फोटो एका ट्विट मध्ये सापडला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहात असलेले जयराम रमेश यांचे ते ट्विट आपण पाहू शकता.
याचबरोबरीने हिंगोली भागात आलेल्या भारत जोडो यात्रेसंदर्भात आणखी कोणी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत का? हे पाहता मूळ फोटोची माहिती देणारे आणखी एक ट्विट आम्हाला सापडले. त्यामध्येही राहुल गांधी यांच्या हाती गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र आढळले नाही.
या मूळ फोटोत राहुल गांधी यांच्या फोटोत एक छायाचित्र आहे. ते कुणाचे आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला कारण राहुल गांधी यांच्या हाती गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असे सांगून व्हायरल होत असलेल्या फोटोशी त्या मूळ फोटोचे साधर्म्य आम्हाला आढळून आले. मूळ फोटो बारकाईने पाहिला असता त्या फोटोत राहुल गांधी यांच्या हाती असलेले छायाचित्र हे अहिल्याबाई होळकर यांचे होते.
दोन्ही फोटोंची तुलना करता राहुल गांधी यांच्या हाती मूळ फोटोतील अहिल्याबाई होळकर यांचे छायाचित्र बदलून त्याठिकाणी एडिटिंग तंत्रांचा वापर करून दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र घालण्यात आल्याचे आम्हाला दिसून आले.
Conclusion
आमच्या तपासणीत हे लक्षात आले आहे की, भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या हिंगोली भागात आली असता राहुल गांधी यांच्या हाती गोपीनाथ मुंडे यांचे नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे छायाचित्र होते. मूळ छायाचित्रात फेरबदल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे.
Result: Altered Photo/Video
Our Sources
Tweet made by Jairam Ramesh on November 12,2022
Tweet made by Anwar Hussain on November 13,2022