Claim
फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधी सातव्या क्रमांकावर असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

Fact
फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधीं सातव्या क्रमांकावर असल्याच्या दाव्याचे फॅक्टचेक न्यूजचेकरने १५ ऑक्टोबर २०२० रोजी केले होते. आमच्या तपासणीनुसार, फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात शिक्षित नेत्यांची अशी कोणतीही यादी प्रकाशित केलेली नाही. याशिवाय, आम्ही फोर्ब्सच्या वेबसाइटवर ‘Rahul Gandhi‘, ‘Rahul Gandhi Educated‘, ‘Most Educated‘ असे अनेक कीवर्ड शोधले, परंतु या प्रक्रियेतही आम्हाला अशी कोणतीही यादी किंवा लेख सापडले नाहीत ज्यात जगातील सर्वात जास्त शिक्षितांची माहिती असेल.

२१ डिसेंबर २००९ रोजी फोर्ब्स इंडियाने प्रकाशित केलेल्या लेखात राहुल गांधी यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ ही पदवी देण्यात आली होती.
भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी १९९५ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून एम.फिल पदवी प्राप्त केली होती.
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधी यांचे नाव सातव्या क्रमांकावर असल्याचा दावा चुकीचा आहे. खरं तर, फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात शिक्षित नेत्यांची अशी कोणतीही यादी प्रकाशित केली नाही.
Result: False
Our Sources
Forbes website
Election affidavit filed by Congress leader Rahul Gandhi in 2019
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा