Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राहुल गांधी हे कन्नड भाषेतील वृत्तपत्र वाचत असल्याचे दिसत आहे. व्हायरल पोस्टममध्ये या पोस्टविषयी अनेक कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. ज्याला हिंदीही व्यवस्थित येत नाही, तो कन्नड वर्तमानपत्र वाचत आहे असा दावा करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी खरंच कन्नड वर्तमानपत्र वाचले का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी व्हायरल फोटो Google Reverse Image च्या साहाय्याने शोधला असता आम्हाला मूळ फोटो One India वेबसाइटवर 16 जून 2017 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत आढळून आला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी बेंगळुरू येथे नॅशनल हेरॉल्डच्या उद्घाटनप्रसंगी अंक हातात घेऊन वाचताना.
याशिवाय आम्हाला नॅशनल हेराॅल्डच्या उद्घटानाचा व्हिडिओ देखील युट्यूबवर आढळून आला.
याशिवाय उद्घाटनाच्या वेळीचा अंक कसा होता याचा देखी एक फोटो युट्यूबवर आढळून आला. यात नॅशनल हेराल्डचा अंक इंग्रजीत असल्याचे दिसते पहिल्या आणि शेवटच्या पानावार कन्नडमध्ये मजकूर आढळतो. त्यामुळे राहुल गांधी कन्नड वर्तमानपत्र वाचत असल्याचे भासवण्यात आलेले दिसते.
राहुल गांधी कन्नड वर्तमानपत्र वाचत असल्याचा दावा या आधीही व्हायरल झाला होता. नॅशनल हेराल्डचे मुख्य संपादक जफर आगा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र तीन भाषांमध्ये वेगवेगळ्या नावाने छापले जाते. नॅशनल हेरॉल्ड हे इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये नवजीवन आणि उर्दूमध्ये क़ौमी आवाज़ नावाने प्रकाशित केले जाते. व्हायरल पोस्ट बनावट आहे. बेंगळुरूमध्ये नॅशनल हेरॉल्डच्या आवृत्तीच्या उद्घाटनाच्या वेळी वृत्तपत्राचे पहिले आणि शेवटचे पृष्ठ कन्नड येथे होते, बाकीची इंग्रजी सामग्री होती.
यावरुन हेच स्पष्ट होते राहुल गांधी यांंनी तीन वर्षापूर्वी नॅशनल हेराल्डच्या नव्या आवृत्तीचे उद्घाटन केले होते त्यावेळी या इंग्रजी अंकाच्या मुख आणि मलपृष्ठावर कन्नडमध्ये मजकुर होता. यामुळे राहुल गांधी कन्नड वर्तमानपत्र वाचत असल्याचा भास झाला व तोच चुकीचा दावा व्हायरल झाला.
One India- https://www.oneindia.com/india/congress-wants-its-leaders-to-read-national-herald-get-more-subscribers-2466153.html
ANI News Official– https://www.youtube.com/watch?v=8QGIndOBxDU
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
May 19, 2024
Prasad S Prabhu
April 7, 2025
Prasad S Prabhu
March 25, 2025