Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
RBI च्या नव्या नियमांनुसार सप्टेंबर पासून पाचशे रुपयांच्या नोटा एटीएम मधून मिळणार नाहीत.
हा दावा खोटा असून एक अफवा आहे.
पाचशे रुपयांच्या नोटांबद्दल सध्या काही मेसेज व्हायरल होत आहेत. RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा देणे बंद करण्याची सूचना बँकांना केली आहे. पाचशे रुपयांच्या नोटे संदर्भात १ सप्टेंबर पासून नवे नियम लागू करणार आहेत. असे दावे केले जात आहेत.


दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
न्यूजचेकर ने केलेल्या तपासात हे दावे अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
पाचशे रुपयांच्या नोटांसंदर्भात RBI कोणती नवी घोषणा केली आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही Google वर शोध घेतला, मात्र आम्हाला यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देणारी बातमी मिळाली नाही. नोटा बंद करण्याचा निर्णय झाला असता तर त्याची मोठी बातमी झाली असती.
दरम्यान आम्ही RBI च्या वेबसाईटवर जाऊन Press Release आणि Master Cicular या विभागांमध्ये शोधले. मात्र RBI ने पाचशे रुपयांच्या नोटांसंदर्भात अशी कोणतीही घोषणा केलेली नसल्याचे आढळले.


दरम्यान RBI ने २८ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये सर्व बँकांना एटीएम मधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटा घालण्याची सूचना केली आहे. हे नोटिफिकेशन येथे पाहता येईल. मात्र यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा घालणे बंद करा असे कुठेही लिहिलेले नाही.

पुढील तपासात १२ जुलै २०२५ रोजी PIB Fact Check ने X वर पोस्ट करून व्हायरल दाव्याचे खंडन केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
“सप्टेंबर २०२५ पर्यंत एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्यास आरबीआयने खरोखरच बँकांना सांगितले आहे का? #WhatsApp वर असाच दावा करणारा एक मेसेज पसरत आहे, @RBI ने अशी कोणतीही सूचना जारी केलेली नाही. ५०० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. अशा चुकीच्या माहितीला बळी पडू नका. अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी नेहमीच पडताळून पहा!” असे मूळ इंग्रजी पोस्टचे भाषांतरण आम्हाला पाहायला मिळाले.
अधिक माहितीसाठी आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक व्यवस्थापक बी. गिरीजा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “RBI ने पाचशे रुपयांच्या नोटांवर कोणतेही नवे नियम लागू केलेले नाहीत. शिवाय एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा घालू नका अशी सूचना बँकांना केलेली नाही. व्हायरल मेसेज खोटा असून जनतेने यावर विश्वास ठेऊ नये.” अशी माहीती दिली.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात पाचशे रुपयांच्यासंदर्भात व्हायरल मेसेज खोटा असल्याचे आणि RBI ने अशाप्रकारे कोणतीही घोषणा केली नसल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Google Search
RBI’s Official Website
X post shared by PIB Fact Check on July 12, 2025
Conversation with B. Girija, Manager, State Bank of India, Udyambag
Prasad S Prabhu
September 20, 2025
Kushel Madhusoodan
September 18, 2025
Prasad S Prabhu
September 6, 2025