Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येत आहे की, हिंदू संघटनेच जवळपास 400 लोक पिराणा गावात घुसून मुस्लिमांना पळून जाण्यास भाग पाडले आहे.
व्हायरल व्हिडिओ शेअर करताना एका फेसबुक युजरने लिहिले आहे की, “अहमदाबादपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या पिराना गावातील मुस्लिमांना हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यास भाग पाडत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये असे ऐकू येते की सुमारे 400 हिंदुत्ववादी लोक गावात घुसले आणि आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले आणि लोक घरे सोडून जात आहेत.
त्याच वेळी, आणखी एका फेसबुक वापरकर्त्याने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “हिंदुवादी संघटनेचे लोक अहमदाबादपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या पिराना गावातील मुस्लिमांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यास भाग पाडत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये असे ऐकू येते की हिंदुत्ववादी संघटनेचे सुमारे 400 लोक गावात घुसले आणि आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले मुस्लिमांना पळून जाण्यास भाग पाडले आणि लोक घरे सोडून जात आहेत.
Fact Check/Verification
आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले या दाव्यासह व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही इनव्हीड टूलच्या मदतीने काही की-फ्रेममध्ये रूपांतरित केले. यानंतर गुगल कीफ्रेमसह रिव्हर्स सर्च केले. या दरम्यान आम्हाला कोणताही मीडिया रिपोर्ट प्राप्त झालेला नाही.
आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले या दाव्याच्या पुष्टिसाठी काही कीवर्डच्या मदतीने गुगलवर सर्च केले. या दरम्यान आम्हाला Indian Express ने 31 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित केलेला रिपोर्च प्राप्त झाला. वृत्तानुसार, अहमदाबाद जिल्ह्यातील दसकरोई तालुक्यातील पिराना गावातील लोक इमाम शाह बाबा संस्थानच्या आवारात भिंत बांधण्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. यावेळी असलली पोलिसांनी 64 महिलांसह 133 आंदोलकांना ताब्यात घेतले. दसकरोईचे उपजिल्हाधिकारी (एसडीएम) के.बी. पटेल यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने तारेचे कुंपण भिंतीत रूपांतरित करण्याचे काम सुरू असताना तीन विश्वस्तांनी भिंत बांधण्यास विरोध केला. अहवालानुसार, निदर्शने पिराना गावातील रहिवाशांनी आयोजित केली होती, बहुतेक सय्यद मुस्लिम. भिंतीच्या बांधकामामुळे मशिदीपासून दर्ग्यात जाण्यास अडथळा निर्माण होईल, असा आरोप त्यांनी केला होता.
व्हायरल व्हिडिओच्या तपासादरम्यान, काही कीवर्डच्या मदतीने ट्विटरवर शोध सुरू केला. दरम्यान, आम्हाला 02 फेब्रुवारी 2022 रोजी इंडिया टीव्ही पत्रकार निर्णय कपूर यांचे एक ट्विट मिळाले आहे. त्यांनी ट्विटसोबत एक व्हिडिओ जोडला आहे. व्हिडिओमध्ये, नासिर शेख नावाचा युवक स्पष्ट करतो की पिरानाच्या लोकांच्या पलायनाबद्दल खोट्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत आणि त्याने जे काही बोलले त्याबद्दल त्याला खेद वाटतो.
मशिदीच्या भिंतीवरील वादाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी न्यूजचेकरने पिराणा दर्गाशी संपर्क साधला. यादरम्यान, आम्हाला तेथील उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिडिओमध्ये सांगितलेली हिजरतची कहाणी पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. दर्ग्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तक्रार देण्यासाठी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते, मात्र या प्रकरणी पोलीस विभागाने 133 हून अधिक लोकांना रस्त्यावरच अडवले होते.
याशिवाय पिराणा दर्ग्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही एक प्रेस रिलीज जारी करण्यात आली आहे. प्रेस रिलीजनुसार, आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले हा दावा चुकीचा आहे, तर पलायन हा सय्यद कुटुंबाने मशिदीच्या आवारात भिंत उभारण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा भाग होता, प्रत्यक्षात कोणीही गाव सोडले नाही.
या संपूर्ण प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी असलाली पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी तेथे उपस्थित पीआरओने पिराणा गावातील मशिदीच्या भिंतीच्या वादातून पलायन नसल्याचे सांगितले. सोशल मीडियावर आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले दिशाभूल करणारा दावा केला जात आहे.
अशा प्रकारे आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सोशल मीडियावर आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. दिशाभूल करणारा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे.
Direct Contact Pirana Dargah
Direct Contact Aslali Police
India TV Journalist Tweet
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
May 21, 2025
Vasudha Beri
May 16, 2025
Prasad S Prabhu
April 25, 2025