Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

HomeFact Checkपाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत 'मोदी-मोदी'चे नारे लागले नाहीत, 2020 चा व्हिडिओ पुन्हा एकदा...

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत ‘मोदी-मोदी’चे नारे लागले नाहीत, 2020 चा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल

Authors

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत ‘मोदी-मोदी’चे नारे लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

युक्रेन मधे अडकलेल्या एका पाकिस्तानी विद्यार्थ्याने भारताचा तिरंगा लावून भारत माता जी जय च्या घोषणा देत आपली सुटका करून घेतली.जगातील सर्व देश आपल्या युक्रेन मधील नागरिकांची मदत करण्यास असमर्थ ठरत असताना एकटा भारतच आपले विद्यार्थी,नागरिक यांची सुटका करत आहे. याचे पडसाद पाकिस्तानी संसदेत उमटले व तिथे मोदी- मोदीचे नारे लागले असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

'मोदी-मोदी'चे नारे
फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

फेसबुक पोस्ट इथे पहा.

फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

Fact Check/Verification

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये ‘मोदी-मोदी’चे नारे घोषणा देण्यात आल्याच्या व्हिडिओच सत्य काय आहे याची पडताळणी करण्याठी आम्ही इनव्हिडच्या साहय्याने त्यातील काही कीफ्रेम्स वेगळ्या केल्या ऑआणि रिव्हर्स इमेजच्या शोध घेतला असता. आम्हाला 26 October 2020 रोजीचा एक युट्यूब व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले ाहे की, Shah Mehmood Qureshi Speech in National Assembly

हा व्हिडिओ पाहिल्यावर पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ‘मोदी-मोदी’ नव्हे तर ‘व्होटिंग-व्होटिंग’ अशा घोषणा दिल्या, त्यानंतर स्पीकर म्हणाले, “मतदान सर्वकाही होईल… सर्व काही. धीर धरा.” वास्तविक, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकमताने इशनिंदेच्या विरोधात ठराव मंजूर करायचा होता, परंतु विरोधी पक्षातील काही सदस्यांनी त्याचवेळी ‘व्होटिंग-व्होटिंग’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री नाराज झाले आणि नाराजी व्यक्त करत म्हणाले की,

ये इतना संजीदा मसला है। हजूर (पैगंबर मोहम्मद) की शान में गुस्ताखी हुई है. गुस्ताखाना खाके पेश किये गए हैं… इसपे पूरी दुनिया मे… पूरी उम्मा में इस ताराफ की कैफियत है और आज इतना गैर संजीदा इस हसास मसले पर विपक्ष का रुख देख कर मुझे अफसोस हुआ… मुझे अफसोस हुआ कि ये एक ऐसा मुकद्दस मसले पर भी सियासत खेल रहें हैं.”

विशेष म्हणजे शाह हे वक्तव्य करत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून व्होटिंग-व्च्याहोटिंग घोषणा स्पष्ट ऐकू येत होत्या. ‘मोदी का जो यार है, गद्दार है…गद्दार है’ आणि “बिकने को जो तैयार है… गद्दार है… गद्दार है”च्या घोषणा देखील एेकू येतात.

विशेष म्हणजे Dawn ने 26/10/2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे की, विरोधी सदस्यांनी केलेल्या घोषणांचा संदर्भ देत, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या इशनिंदेच्या विरोधात एकमताने ठराव मंजूर केल्याची माहिती देण्यात आली आहे. यादरम्यान काही सदस्यांनी विरोध केला. विरोधकांनी एकाच वेळी ‘व्होटिंग-व्होटिंग’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये ‘मोदी-मोदी’चे नारे देण्याच्या नावाखाली शेअर केला जाणारा हा व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये, अनेक भारतीय माध्यमांनी दावा केला होता की ,पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये ‘मोदी-मोदी’चे नारे लागले होते. त्यावेळीही Newschecker च्या पडताळणीत हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले होते.

Conclusion

अशा प्रकारे भारताने आपल्या नागरिकांना युक्रेनमधून सुखरुप बाहेर काढले आणि पाकिस्तानने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या नॅशनल असेंब्लीत मोदी-मोदी चे नारे लागल्याचा दावा खोटा आहे.

Result: Misleading

Our Sources
YouTube video by Dunya News
Report published by DawnSources

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular