Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkसंजय राऊत यांनी 'तालिबान लोकशाहीवर चालणारा समूह'असल्याचे म्हटले आहे?

संजय राऊत यांनी ‘तालिबान लोकशाहीवर चालणारा समूह’असल्याचे म्हटले आहे?

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

तालिबानने अफगानिस्तानवर कब्जा केल्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या. भारतातील अनेक दिग्गजांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अशातच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी “तालिबान हा लोकशाहीवर चालणारा समूह आहे” असे म्हटल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

आमच्या काही वाचकांनी ही पोस्ट शेअर करुन याबाबत पडताळणी करण्यास सांगितले आहे. याच दाव्याच्या अनेक पोस्ट आम्हाला फेसबुकवर आढळून आल्या आहेत.

Fact Check/Verification

संजय राऊत यांनी खरंच तालिबान हा लोकशाहीवर चालणारा संघ आहे असे वक्तव्य केले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला वन इंडियाचा एक व्हिडिओ आढळून आला. ज्यात संजय राउत यांनी माध्यमांशी हिंदीत बोलताना म्हटले आहे की, तालिबान वाढत आहे आणि तालिबानला पाकिस्तान आणि चीनची मदत मिळत आहे जे हिंदुस्तानचे शत्रू आहेत. आणि आता अफगाणिस्तानची भूमी आणि तालिबानचा वापर हिंदुस्तानाविरु्ध होऊ शकतो. हा धोक तर आपल्याला आहे. जर अशा वातावरणात या देशात कुठेही तालिबानच्या समर्थनार्थ आवाज उठत असेल तर तो आवाज संपवला पाहिजे. ही जबाबदारी सरकारची आहे, गृहमंत्रालयाची आहे आणि पंतप्रधानांची आहे.

यात कुठेही तालबिन हा लोकशाहीवर चालणार संघ असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याचे आढळले नाही उलट तालिबानकडून देशाला धोका असल्याचे म्हटले आहे. यानंतरही आम्ही संजय राऊत यांचे तालिबानींवर प्रतिक्रियांचे व्हिडिओ आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

याच शोधा दरम्यान झी 24 तासच्या बातमीचा 16 आॅगस्ट 2021 रोजीचा व्हिडिओ आढळून आला. याच दिवशी सोशल मीडियात संजय राउतांच्या वक्तव्याबाबत दावे व्हायरल झाले होते. आम्ही या व्हिडिओत संजय राऊत यांनी हिंदीत दिलेली प्रतिक्रिया बारकाईने एेकली. ते म्हणतात- पूरे विश्व को चिंता है,अफगाणिस्तान में क्या होगा। और हमारे पूरे वर्ल्ड में क्या परिणाम होगा। अमरिका से लेकर रशिया तक और हिंदुस्तान से लेकर वहां.. कई। एक तो तालिबानी लोग है वो डेमोक्रोसी मानते नहीं, इस्लामिक ग्रुप है, टेरेरिस्ट ग्रुप है, जिस तरह से सत्ता पर कब्जा किया है तो हिंदूस्तान को भी बहुत सावधान रहना पडेगा।

या व्हिडिओत खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट म्हटले आहे की, तालबानी लोक हे लोकशाही मानत नाहीत. तसेच संजय राउत यांनी या व्हिडिओत देखील भारताला सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांनी कुठेही तालिबानचे समर्थन केल्याचे आढळून आलेले नाही.

Conclusion 

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की संजय राऊत यांच्या तालिबान संदर्भातील वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला व चुकीचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला.

Result- Misleading 

Our Source

झी 24 तास- https://www.youtube.com/watch?v=lWunUay0gII

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular