Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
लोकं उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हणत असतील तर वावगं काय, असे संजय राऊत म्हणाले.
Fact
खासदार संजय राऊत यांच्या नावाने व्हायरल केलेले विधान खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावे एक दावा व्हायरल झाला आहे. “लोकं उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हणत असतील तर वावगं काय? हिंदू हृदयसम्राटचा मुलगा पण एका दुसऱ्या धर्माचा हृदयसम्राट असू शकतो.” असे संजय राऊत यांनी म्हटल्याचे फेसबुकवरील हा दावा सांगतो.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
आम्हाला हा दावा X वरही (संग्रहण) सापडला.
“आमची काहीच हरकत नाही. हेच तर आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय.” या कॅप्शनखाली हा दावा शेयर करण्यात आला आहे.
व्हायरल दाव्याच्या तपासणीसाठी संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून आम्ही Google वर शोधले. मात्र आम्हाला याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असे विधान केले असते तर त्याची सर्वत्र बातमी झाली असती. मात्र तसे आढळले नाही.
व्हायरल न्यूजकार्डमध्ये आम्हाला लोकमत चा लोगो दिसला. दरम्यान लोकमत या माध्यमाने यासंदर्भात कोठे बातमी किंवा पोस्ट केली आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही लोकमतची अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेज आणि X अकाउंट शोधले. मात्र आम्हाला अशी माहिती मिळाली नाही.
खासदार संजय राऊत यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर आणि X खात्यावरही आम्ही याबद्दल शोधले. मात्र त्यांच्या या विधानाबद्दल कोणतीच माहिती आम्हाला मिळाली नाही.
तपास करीत असताना हे न्यूजकार्ड खोटे असल्याचे सांगणारी लोकमत ने १९ ऑक्टोबर २०२४ रोजी केलेली पोस्ट आम्हाला मिळाली.
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबतचे एक दिशाभूल करणारे क्रिएटिव्ह ‘लोकमत’च्या नावाने व्हायरल करण्यात आलं आहे. मात्र असं कोणतंही क्रिएटिव्ह ‘लोकमत’कडून करण्यात आलं नसून सोशल मीडियात एका विशिष्ट विचारधारेच्या समर्थकांनी ‘लोकमत’चे नाव आणि लोगो वापरून केलेला हा खोडसाळपणा आहे.” असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलेले आहे.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात खासदार संजय राऊत यांनी न केलेल्या विधानाचा समावेश लोकमतचा लोगो वापरलेल्या न्यूजकार्डमध्ये करून दिशाभूल केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Google Search
Social Media accounts of Lokmat
Social Media accounts of MP Sanjay Raut
Post made by lokmat on October 19, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
July 14, 2025
Prasad S Prabhu
April 12, 2025
Prasad S Prabhu
April 11, 2025