Authors
Claim
शिर्डी साई ट्रस्टने हज समितीला 35 कोटींची देणगी दिली राम मंदिराला एक रुपयाही दिला नाही.
Fact
शिर्डी साई ट्रस्टचे सीईओ आणि पीआरओ यांनी स्पष्टीकरण दिले आहे की व्हायरल संदेश पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.
शिर्डी साई मंदिर ट्रस्टच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिर्डी साई ट्रस्टकडून हज समितीला 35 कोटींची देणगी दिल्याचा दावा केला जात आहे. तर काही युजर्स म्हणत आहेत की शिर्डी साई मंदिराने हज समितीला 35 कोटी देणगी देत असताना अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देण्यास नकार दिला.
हा मेसेज ट्विटर वर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. या मेसेजची आर्काइव्ह लिंक येथे पाहिली जाऊ शकते. तसेच हा मेसेज व्हाट्सअपवर ही मोठ्याप्रमाणात फिरत आहे.
फेसबुकवरही हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहता येईल.
Fact Check / Verification
न्यूजचेकरने या दाव्याची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला. आम्ही कीवर्ड सर्चच्या माध्यमातून शिर्डी साई ट्रस्ट ने हज कमिटीला कोणती मोठी देणगी दिली आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला तसे कोणतेही अधिकृत मीडिया रिपोर्ट्स हाती लागले नाहीत.
शिर्डी साई ट्रस्टने हज समितीला 35 कोटी देणगी दिल्याच्या दाव्यावर गुगल सर्च केल्यावर फॅक्टचेक वेबसाइट latestly ने 24 एप्रिल रोजी पोस्ट केलेला रिपोर्ट समोर आला. यामध्ये शिर्डी साई ट्रस्टचे सीईओ राघव जाधव यांनी स्पष्ट केले की, “रामजन्मभूमी ट्रस्टकडून देणगी मागणारी कोणतीही विनंती किंवा संदेश आलेला नाही आणि हजसाठी कोणतीही रक्कम दान केलेली नाही. सोशल मीडियावर एक दिशाभूल करणारा संदेश व्हायरल होत आहे.”
या व्हायरल दाव्याबाबत आम्ही शिर्डी साई ट्रस्टच्या पीआरओशी संपर्क साधला. ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश व्हायरल होत आहेत, साई मंदिर ट्रस्टने राम मंदिर किंवा हज समितीला कोणतीही रक्कम दान केलेली नाही.”
Conclusion
शिर्डी साई ट्रस्टने हज समितीला 35 कोटींची देणगी दिल्याचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. शिर्डी साई ट्रस्टचे सीईओ आणि पीआरओ यांनी स्पष्टीकरण दिले आहे की व्हायरल संदेश पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.
Result : False
Our Sources
Report published by latestly on April 24, 2023
Conversation with PRO, Shri Shirdi Sai Trust
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in