Claim
भारत सरकारने 200 रुपयांच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे.

Fact
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केले. आम्हाला NDTV च्या वेबसाइटवर ऑक्टोबर 2022 मध्ये प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. वृत्तानुसार, महाराष्ट्रातील भाजप आमदार नितेश राणे यांनी नोटेवर शिवाजी महाराजांचा फोटो छापण्याची सूचना केली होती. राणेंनी 200 रुपयांच्या नोटेचा संपादित फोटो शेअर केला होता, ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणेश-लक्ष्मीचा फोटो छापण्याचा मुद्दा पुढे आणल्यानंतर त्यांनी हा फोटो शेअर केल्याचे वृत्तात म्हटले आहे.

तपासादरम्यान, आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची वेबसाइट आणि तिचे सोशल मीडिया हँडल देखील शोधले. आम्हाला तेथे अशी कोणतीही माहिती सापडली नाही, ज्यामुळे व्हायरल दाव्याची पुष्टी होईल. आम्ही मेलद्वारे आरबीआयशीही संपर्क साधला आहे. उत्तर आल्यावर लेख अपडेट केला जाईल.
त्यामुळे 200 रुपयांचे एडिट केलेले चित्र खोट्या दाव्याने शेअर केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: Altered Media
Our Sources
NDTV Report
RBI Website and Social Media Handle
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: [email protected]
Aapan pratyek batami magill satya shodhun kadhta.ya baddal aaple aabhar lokana satya samajate pan te ushira karan kadhi kadhi kanhi batman mule anarth hovun gelela asto.aso punha ekda aabhari aahe.