Monday, December 22, 2025

Fact Check

तामिळनाडूमध्ये रुद्राक्षची माळ घातल्यामुळे ख्रिश्चन शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली?

Written By Yash Kshirsagar
Oct 19, 2021
banner_image

तामिळनाडूमध्ये रुद्राक्षची माळ घातल्यामुळे ख्रिश्चन शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तामिळनाडूमध्ये 1 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या वर्गात येणे अनिवार्य केले गेले नाही. तथापि, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी घोषणा केली आहे की 1 नोव्हेंबर 2021 पासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या शाळा एकदा पुन्हा उघडल्या जातील. दरम्यान, हिंदी वृत्तवाहिनी सुदर्शन न्यूजच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 30 सेकंदाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एका शाळेच्या वर्गातील आहे, जिथे एक व्यक्ती मुलाला लाठ्या -काठ्यांनी मारत आहे. व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, या हिंदू विद्यार्थ्याला तामिळनाडूच्या सरकारी शाळेत मारहाण केली जात आहे कारण तो रुद्राक्षाची माळ घालून शाळेत आला होता. ख्रिश्चन शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली आणि त्याला शाळेतून पलवून लावले.

हा लेख लिहीपर्यंत व्हायरल ट्विट 3600 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे आणि 4 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

 सुदर्शन न्यूजचा हा व्हारल व्हिडिओ फेसबुक वर देखील मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Crowdtangle टूलवर केलेले विश्लेषण दर्शवते की व्हायरल दावा सोशल मीडियावर अनेक युजर्सनी शेअर केला आहे. ‘धर्म रक्षा जागृती मिशन’ नावाच्या फेसबुक पेजद्वारे पोस्ट केलेला व्हिडिओ 5200 पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आणि 315 लोकांनी शेअर केला आहे.

Fact Check/Verification

तामिळनाडूच्या सरकारी शाळेत रुद्राक्षाची माळ घातल्याबद्दल ख्रिश्चन शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली? या दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केले. दरम्यान, 15 ऑक्टोबर 2021 रोजी

BBC आणि Republic Bharat ने प्रसिद्ध केलेले रिपोर्ट आढळून आले. रिपोर्टमधील माहितीनुसार, तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम येथे एका शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ चिदंबरम नंदनर बॉईज हायस्कूल (Chidambaram Government Nandanar High School) चा आहे. खरं तर विद्यार्थी वर्गात हजर राहत नव्हता, त्यामुळे भौतिकशास्त्राच्या शिक्षकाने त्याला लाठ्या आणि लाथांनी बेदम मारहाण केली.

तपासाच्या पुढील टप्प्यात, आम्हाला 16 ऑक्टोबर 2021 रोजी ANI  आणि The Hindu ने प्रकाशित केलेले रिपोर्ट्स आढळले. या दोन्ही रिपोर्टनुसार, व्हिडिओ रेकॉर्डच्या आधारे शिक्षकाविरुद्ध SC / ST कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला रिमांडसाठी पाठवण्यात आले आहे. पीडित विद्यार्थ्याला चिदंबरम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्याच्या वडिलांनीही सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये असे आवाहन केले.

तपासादरम्यान, आम्हाला चेंगलपट्टू जिल्हा पोलिस अधिक्षक विजय कुमार यांच्या अधिकृत हँडलवर एक ट्विट आढळून आले. ट्विटद्वारे त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबाबतचा दावा खोटा आहे.

व्हायरल दाव्याच्या तळाशी जाण्यासाठी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुमुगम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, “सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओसह केलेला दावा खोटा आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शिक्षकाविरुद्ध एससी/एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ चुकीच्या दाव्याने शेअर केला जात आहे.


Result: Misleading


Our Sources

BBC 

Republic Bharat

ANI 

The Hindu

Police Verification


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

20,658

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage