Tuesday, November 19, 2024
Tuesday, November 19, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह...

फॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह व्हायरल

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनात सर्व मुस्लिम आहेत.
Fact
व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये असलेली नावे पाकिस्तानी कंपनी एआर फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या उच्च व्यवस्थापनाची आहेत.

तिरुपती लाडू वादाशी संबंध जोडणारा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, ज्यांच्या सॅम्पलमध्ये जनावरांची चरबी गोमांस आणि स्वयंपाकात वापरण्याची डुकराची चरबी असल्याची पुष्टी झाली आहे त्या तूप उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनात सर्व मुस्लिम आहेत.

तथापि, आम्हाला आढळले की व्हायरल स्क्रीनशॉट तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांच्या चरबीचे घटक आढळलेल्या तामिळनाडूच्या एआर डेअरी फूड्स कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाचा नाही, तर पाकिस्तानी कंपनी एआर फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या उच्च व्यवस्थापनाचा आहे. हा स्क्रिनशॉट म्हणजे पाकिस्तानी कंपनीच्या उच्च व्यवस्थापनातील मंडळींच्या नावाची यादी आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा मुद्दा जोर धरत आहे. हा संपूर्ण वाद तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीतील बदलाशी संबंधित आहे. वास्तविक गेल्या पन्नास वर्षांपासून तिरुपती मंदिर ट्रस्टला स्वस्त दरात तूप पुरवत होता. तिरुपती मंदिरात दर सहा महिन्यांनी सुमारे 1400 टन तूप वापरले जाते. परंतु मंदिर ट्रस्टने जुलै 2023 मध्ये कर्नाटक को ऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशनला स्वस्त दरात तूप पुरवठा करण्यास सांगितले.

कंपनीने कमी दराने तूप पुरवठा करण्यास नकार दिला. यानंतर आधीच्या जगन सरकारच्या काळात अस्तित्वात असलेल्या तिरुपती टेम्पल ट्रस्टने 5 कंपन्यांना तूप पुरवण्याचे काम दिले. यापैकी एक तामिळनाडूच्या दिंडीगुल येथील एआर डेअरी फूड्स होते. त्यानंतर जून 2024 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये सरकार बदलले आणि चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील TDP सत्तेवर आली, TDP सरकारने आयएएस अधिकारी जे श्यामला राव यांना तिरुमाला तिरुपती देवस्थानम, तिरुपती मंदिर ट्रस्टचे नवीन कार्यकारी अधिकारी बनवले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लाडूंच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे आदेश दिले आणि तुपाचे नमुने गुजरातमधील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल जुलैमध्ये आला होता आणि त्यात प्राण्यांच्या चरबीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर ट्रस्टने दिंडीगुल येथील एआर डेअरी फूड्सने पाठवलेला तुपाचा साठा परत केला आणि त्याला काळ्या यादीत टाकले.

व्हायरल दावा ज्या स्क्रीनशॉटसह शेअर केला जात आहे, त्यात शीर्षस्थानी लिहिले आहे, तिरुपती बालाजीला देसी तूप पुरवणाऱ्या तमिळनाडू कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाची नावे खालीलप्रमाणे आहेत. यानंतर खाली नमूद केलेल्या नावांमध्ये एसएम नसीम जावेद, मोहम्मद नसीम, ​​मोहम्मद नोमान, राहिल रहमान, लिओनिदास शेख यांचा समावेश आहे.

सोशल मीडियावर हा दावा शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, “ये उनके नाम है. जो तिरुपति बालाजी में घी भेज रहे थे. पद कितना भी बड़ा हो. उन्हें हिन्दूओ की धर्म भ्रष्ट करके कैसे भी कमजोर करना है. अर्थात वो मानते है कि अगर हमारा धर्म भ्रष्ट नहीं किया गया तो हम ताक़तवर हैं”. 

फॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह व्हायरल
Courtesy: X/TriShool_Achuk

Fact Check/ Verification

Newschecker ने व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, प्रथम तिरुपती लाडू वादाशी संबंधित बातम्या पाहिल्या. या दरम्यान आम्हाला 21 सप्टेंबर 2024 रोजी हिंदुस्तान टाईम्सच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. यात तमिळनाडूच्या एआर डेअरी फूड्स कंपनीबद्दल माहिती देण्यात आली होती, जी जुलै 2023 नंतर तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये होती.

फॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह व्हायरल
Courtesy: Hindustan Times

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, एआर डेअरी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, दिंडीगुल, तामिळनाडू येथे स्थित एक कंपनी 1995 मध्ये सुरू झाली आणि या कंपनीचे तीन संचालक आहेत, ज्यांची नावे राजसेकरन आर, सुरिया प्रभा आर आणि श्रीनिवास एसआर आहेत. कंपनीने पीटीआयला दिलेल्या माहितीत असे देखील म्हटले आहे की, कंपनीने तिरुपती मंदिरात फक्त जून आणि जुलै महिन्यातच तूप पाठवले होते आणि याच काळात त्याचा प्रयोगशाळेचा अहवालही पाठवण्यात आला होता.

याशिवाय, आम्हाला 21 सप्टेंबर 2024 रोजी Aaj Tak च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील आढळला. ज्यामध्ये, तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी पीटीआयला दिलेल्या निवेदनाचा हवाला देऊन असे सांगण्यात आले की तिरुपती मंदिर मंडळाचे पाच तूप पुरवठादार आहेत, हे पुरवठादार प्रीमियर ॲग्री फूड्स, कृपाराम डेअरी, वैष्णवी, श्री पराग मिल्क आणि एआर डेअरी आहेत. त्यांच्या किमती 320 रुपये ते 411 रुपये प्रति किलोपर्यंत आहेत. त्यापैकी एआर डेअरीने पाठवलेले चार तुपाचे टँकर प्रथमदर्शनी निकृष्ट असल्याचे आढळून आले. परंतु एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडने स्पष्ट केले की त्यांनी नोंदणीकृत लॅबमधून चाचणी केल्यानंतरच तुपाचा पुरवठा केला होता.

फॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह व्हायरल
Courtesy: AAJ TAK

आता आम्ही या तामिळनाडू स्थित कंपनीची वेबसाइट शोधली. यावेळी राज मिल्क नावाची वेबसाईट सापडली, जी ए.आर. डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडचा भाग आहे. ही कंपनी 1995 मध्ये सुरू झाल्याचे संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.

फॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह व्हायरल
Courtesy: RAAJ MILK

याशिवाय, वेबसाइटवर असेही नमूद केले आहे की कंपनीचे तीन संचालक आहेत, ते राजशेकरन आर, सुरिया प्रभा आर आणि श्रीनिवासन एसआर आहेत. कंपनीच्या तांत्रिक टीम सदस्यांची नावे आहेत शरद चंद्र बसा, माणिककावसगम आर, लक्ष्मीनरसिंहन अय्यर आणि राजदर्शिनी आर. तसेच कंपनीचा पत्ता म्हणून तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्याचा उल्लेख आहे.

यानंतर, आम्ही आमच्या तपासाचा विस्तार केला आणि त्या कंपनीबद्दल देखील शोध घेतला, ज्याचे नाव व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. कीवर्ड शोधावर, आम्हाला rocketreach.co च्या वेबसाइटवर AR Foods Private Limited बद्दल माहिती मिळाली. आम्हाला असेही आढळले की व्हायरल स्क्रीनशॉट या वेबसाइटवरून घेण्यात आला आहे. या वेबसाइटवर एआर फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचा पत्ता इस्लामाबाद, पाकिस्तानची राजधानी असा उल्लेख आहे.

फॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह व्हायरल
Courtesy: ROCKET REACH

एआर फूड्स प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाइट तपासल्यानंतर असे आढळून आले की ही कंपनी “Phool” या नावाने तांदूळ आणि मसाले यांसारख्या विविध उत्पादनांची विक्री करते. ही कंपनी भारताची नसून पाकिस्तानची आहे.

फॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह व्हायरल

न्यूजचेकरने तमिळनाडूस्थित एआर डेअरी फूड्स प्रायव्हेट लिमिटेडशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे उत्तर आल्यावर लेख अपडेट केला जाईल.

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल लोकांच्या नावांची यादी पूर्वी तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या तामिळनाडू येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांची नाही. खोटा दावा शेअर केला जात आहे.

Result: False

Our Sources
Report Published by Hindustan Times on 21th Sep 2024
Report Published by AAJ TAK on 21th Sep 2024
Info available on RAAJ Milk Website
Info available on AR FOODS PVT Limited


(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular