Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
T20 विश्वचषक 2022 च्या सराव सामन्यात भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावल्याचा दावा फेसबुकवरील एका व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे.तसेच व्हिडीओच्या थंबनेलमध्ये त्याने 67 चेंडूत 24 षटकार आणि 18 चौकारांसह 214 धावा केल्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे.भारत आणि न्यूझीलंडचा सराव सामना 19 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार होता.मात्र पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला.याबाबतच्या सर्व बातम्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत.ही माहिती टी-20 वर्ल्ड कपच्या वेबसाइटवरही पाहता येईल.

हा एक क्लिकबेट व्हिडिओ आहे,ज्याचे थंबनेल खोटी माहिती लिहून अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहेत की लोक व्हिडिओवर क्लिक करतात आणि त्याचे व्ह्यूज जास्तीत जास्त असू शकतात.दिनेश कार्तिकने 2022 च्या T20 विश्वचषकात अशी कोणतीही इनिंग खेळलेली नाही.भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
जर तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर,येथे क्लिक करा.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी,दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी,आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल: checkthis@newschecker.in
Vasudha Beri
November 4, 2025
Vasudha Beri
October 6, 2025
Kushel Madhusoodan
September 19, 2025