Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
विक्रीचे लक्ष्य पूर्ण झाल्याने टाटा मोटर्स सफारी गाडी मोफत देत आहे, असा एक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या मेसेज सोबत एक लिंक शेअर केली जात आहे. यात म्हटले आहे की टाटा मोटर्सने 30 लाख सफारी गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य पूर्ण केल्याने टाटा सफारी मोफत मिळविण्याची संधी आपणास उपलब्ध झाली आहे. लिंक ओपन केल्यावर काही प्रश्न विचारले जातील, ज्याची उत्तरे देऊन आपण टाटाची सफारी गाडी जिंकू शकता.
आमच्या एका वाचकाने व्हाट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या हा मेसेज पडताळणीसाठी आमच्याकडे पाठविला आहे. हा मेसेज अनेक सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरती व्हायरल होत आहे.
एका ट्विटर यूजरने देखील हा मेजेस खरा आहे का? असे रतन टाटा यांनी टॅग करुन विचारले आहे.
व्हायरल होत असेलली लिंक ओपन केली असता चार प्रश्न विचारले जातात आणि चारही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर अभिनंदन आपण दिलेली उत्तरे यशस्वीरित्या जतन केली गेली आहेत. असे सांगण्यात येते. त्यानंतर आपण टाटा सफारी गाडी जिंकली आहे, तरी आपण रजिस्ट्रेशन करावे आणि आपल्या 20 मित्रांना देखील ही लिंक शेअर करा. आपले बक्षीस 5 ते 7 दिवसांत आपल्याला मिळून जाईल, असा मेसेज येतो.
टाटा मोटर्सबाबत व्हायरल होत असलले्या दाव्याची आम्ही पडताळणी सुरु केली यासाठी Google मध्ये काही किवर्ड्सच्या साहाय्याने शोध सुरु केला. पण आम्हाला व्हायरल होत असलेल्या दाव्या संबंधी माहिती किंवा बातमी आढळून आली नाही त्यामुळे आम्ही शोध पुढे चालूच ठेवला आणि आणि टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली, पण आम्हाला वेबसाईटवर कारचे विक्रीचे लक्ष्य पूर्ण झाल्याने असी कोणतही आॅफर सुरु केल्याची माहिती तेथे आढळून आली नाही. मात्र आम्हाला तेथे एक इशारावजा मेसेज आढळून आला. ज्यात कंपनीने म्हटले आहे की, “ आमची कंपनी अशी कोणतीही स्पर्धा घेत नाही. कोणताही विनामूल्य माल देत नाही. अशा व्हायरल मेसेजच्या जाळ्यात अडकू नका. धन्यवाद.”
आम्हाला टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाईटवर एक प्रसिद्धीपत्रक मिळाले. 1 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार टाटा मोटर्सची देशांतर्गत विक्री 24552 वाहनांची होती, तर मे 2021 मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण 26,661 वाहने विकली गेली.
आम्ही टाटा समूहाच्या अधिकृत वेबसाईटची लिंक आणि व्हायरल लिंक पडताळून पाहिली असता व्हाययरल लिंक बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
या शोधादरम्यान आम्ही टाटा मोटर्सच्या अधिकृत ट्विटर हँडल भेट दिली असता 6 जून 2021 रोजीचे एक ट्विट आढळले. त्यात म्हटले आहे की टाटा मोटर्सने अशी कोणतीही स्पर्धा जाहीर केलेली नाही. आम्ही सर्व लोकांना अशा लिंकआणि संदेश टाळण्यास सावध करतो.
टाटा मोटर्सच्या याच ट्विटर हॅंडलवर आम्हाला आणखी एक ट्विट आढळून आले. ज्यात व्हायरल दाव्याबाबत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यात त्यांनी युजरला ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे की, “टाटा मोटर्सने अशी कोणतीही स्पर्धा जाहीर केलेली नाही.”
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, विक्रीचे लक्ष्य पूर्ण झाल्याने टाटा मोटर्सने सफारी गाडी मोफत जिंकण्यासाठी कोणतीही स्पर्धा किंवा योजना सुरु केलेली नाही.
Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही
Claim Review: विक्रीचे लक्ष्य पूर्ण झाल्याने टाटा मोटर्सने सफारी गाडी मोफत देण्याची घोषणा केली. Claimed By: Viral Post Fact Check: False |
TATA Motors-
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.