Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkरतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले...

रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे असा एक दावा सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. देशात कोरोना रुग्णांना आॅक्सिजन कमी पडू लागल्यानंतर मागील महिन्यात टाटा स्टीलने दररोज 800 टन इतका पुरवठा सुरु केला होता. यामुळे देशात पुन्हा एकदा टाटा समुहाची प्रशंसा केली जात आहे. अशातच रतन टाटा यांच्या नावाने देशासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे विधान व्हायरल होत आहे.

शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली तसेच आमच्या एका वाचकाने याची सतत्या पडताळणी करण्याच सांगितले होते. त्यांनी ही पोस्ट आम्हाला व्हाट्सअॅप द्वारे पाठविली आहे.

व्हाटसएप्प पोस्ट
शेअरचॅट पोस्ट

याबाबत आम्हाला फेसबुकवर देखील टाटांनी भारताला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करणार असल्याचे वक्तव्य केल्याची पोस्ट अनेक युजर्सनी शेअर केली आहे.

Fact Check/Verification

रतन टाटा यांनी कोरोनामुक्त भारतासाठी सगळी संपत्ती दान करण्याचे व्यक्तव्य केले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. रतना टाटांच्या कोविडकाळातील दानशुरतेचा अनेक बातम्या आढळून आल्या. मात्र आम्हाला मुख्य प्रवाहातील माध्यमांत याबाबत संपत्ती दान करण्याविषयीची एकही बातमी आढळून आली नाही

रतन टाटा यांनी मार्च महिन्यात 1500 कोटींची मदत करणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळची बातमी देखील आम्हाला टाईम्स आॅफ इंडियाच्या वेबसाईटवर आढळून आली मात्र या बातमीत देखील रतन टाटा यांनी आपली सगळी संपत्ती भारत कोरोनामुक्त होण्यासाठी देण्यास तयार असल्याचे म्हटल्याचा उल्लेख नाही.

यानंतर आम्ही रतन टाटा यांच्या ट्विटर हॅंडलला भेट दिली मात्र तिथेही त्यांनी अशी घोषणा केल्याचे एक ही ट्विट आढळून आले नाही. मात्र त्यांनी टाटा समुहाने कोविड रुग्णांसाठी आॅक्सिजन पुरवठा वाढविण्याचे ट्विट केल्याचे आम्हाला आढळून आले. त्यातही त्यांनी कोरोनामुक्त भारतासाठी संपत्ती देण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही.

याच शोधादरम्यान आम्हाला न्यूज18 लोकमतची बातमी आढळून आली ज्यात “टाटा स्टील ने दररोज 600 टनांवरुन 800 टनांपर्यंत आॅक्सिजन पुरवठा वाढविला आहे अशी माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, कोरोना दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णालयांध्ये मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा पाहायला मिळतो आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता आता टाटा स्टीलने कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी दररोज केला जाणारा पुरवठा वाढवला आहे. टाटा स्टीलने आता पुरवठ्याची क्षमता 600 टनवरून 800 टन केली आहे.टाटा स्टीलने बुधवारी अशी माहिती दिली आहे की, त्यांनी कोव्हिड-19 रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकल ऑक्‍सिजनचा पुरवठा आणखी वाढवून दररोज 800 टन केला आहे. सोमवारी कंपनीने अशी माहिती दिली होती की, रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठा वाढवून 600 टन केला आहे. टाटा स्टीलने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.” या बातमीत देखील रतन टाटा भारत कोरोनामुक्त होण्यासाठी आपली सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचा उल्लेख नाही.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, भारत कोरानामुक्त होण्यासाठी आपली सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे वक्तव्य रतन टाटा यांनी केलेले नाही. सोशल मीडियात टाटा यांच्या वक्तव्याची खोटी पोस्ट व्हायरल होत आहे.

Read More : देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा डाॅक्टरचा दावा, जाणून घ्या सत्य

Result: False

Claim Review:  रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटले
Claimed By: Social Media post
Fact Check: Misleading

Our Sources

रतन टाटा ट्विटर- https://twitter.com/RNTata2000

टाईम्स आॅफ इंडिया https://www.indiatoday.in/india/story/coronavirus-india-tata-trusts-five-hundred-crore-covid19-pandemic-1660732-2020-03-28


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular