Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
उत्तर प्रदेशात जनतेने भाजपच्या लोकांचा पाठलाग करून मारहाण केली.
Fact
नाही, हा व्हिडिओ तेलंगणातील आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जमाव भारतीय जनता पक्षाचे स्कार्फ घातलेल्या काही लोकांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे, जिथे लोकांनी भाजपच्या सदस्यांना पळवून लावले आणि मारहाण केली.
मात्र, आमच्या तपासात हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नसून तेलंगणातील जानगाव येथील असून सुमारे दोन वर्षे जुना असल्याचे आढळून आले.
व्हिडीओ व्हायरल दाव्याच्या कॅप्शनसोबत व्हेरीफाईड X अकाऊंटच्या माध्यमातून लिहिले आहे कि, “यूपी में जनता ने भाजपाइयों को दौड़ा दौड़ा कर पीटा! लगता है शुरुआत हो चुकी है”.
Newschecker ने प्रथम व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेमचा रिव्हर्स इमेज सर्च केला. यावेळी, आम्हाला टीव्ही 9 तेलुगूच्या YouTube खात्यावरून 9 फेब्रुवारी 2022 रोजी Live केलेला व्हिडिओ आढळला.
या व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागातच व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित दृश्य पाहायला मिळाले. व्हिडिओच्या वर्णनात दिलेल्या माहितीनुसार, जनगावमध्ये तेलंगणा राष्ट्र समिती आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे हे दृश्य आहे.
शोधताना, आम्हाला 10 फेब्रुवारी 2022 रोजी टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेला व्हिडिओ रिपोर्ट देखील सापडला. या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडीओशी संबंधित दृश्यही पाहायला मिळाले.
व्हिडिओ रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी 8 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यसभेत तेलंगणा राज्याच्या निर्मितीबाबत विधान केले होते. यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीने निषेध केला. या निदर्शनादरम्यान टीआरएस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली.
खरे तर, फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यसभेत तेलंगणाबाबत विधान करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काँग्रेस सरकारच्या काळात आंध्र प्रदेशचे विभाजन चुकीच्या पद्धतीने झाले. याबाबत काँग्रेस आणि टीआरएसने पंतप्रधानांचा निषेध केला होता.
आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेशचा नसून तेलंगणाचा आहे.
Our Sources
Video Report by TV9 Telugu on 9th Feb 2022
Video Report by TOI on 10th Feb 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025
Vasudha Beri
July 1, 2025