Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
सोशल मीडियात सध्या एका प्राध्यापकाचा बाळ पोटाशी धरुन विद्यार्थ्यांना शिकवतानाचा फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की फोटोतील बाळ त्या प्राध्यापकाचे आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, या प्राध्यापकांची पत्नी बाळाला जन्म देताना निधन पावली. मात्र ते ना खचले, ना त्यांनी हार मानली . ते त्यांची आपल्या बाळाप्रति आणि कॉलेज संबंधित कर्तव्य दोन्हीही एकाचवेळी चांगल्याप्रकारे निभावत आहेत.
Fact Check / Verification
आम्ही इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरु केली. सर्वप्रथम गुगल रिव्हर्स इमेजच्या साह्याने शोध घेतला असता. आमच्या शोधात व्हायरल फोटो justsomething.co नावाच्या वेबसाईटवर आढळून आला. यात म्हटले आहे हा प्राध्यापक आपल्या एका विद्यार्थ्याच्या मुलाची काळजी घेत आहे.
व्हायरल फोटोची अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही गूगलमध्ये बारकाईने शोध घेतला असता आम्हाला हा फोटो सीएनएन या वेबसाईटवर स्पॅनिश भाषेत 13 जुलै 2016 मध्ये प्रकाशित एका लेखात आढळून आला.
लेख समजून घेण्यासाठी आम्ही गुगल ट्रान्सलेटरची मदत घेतली. ज्यानंतर आम्हाला समजले की हा फोटो मेक्सिको मधील Inter-American University for Development विद्यापीठात शिकवणा-या Moisés Reyes Sandoval प्राध्यापकाचे आहे. लेखात असे म्हटले आहे की शिक्षकाच्या कडेवर दिसणारे बाळ त्यांच्या 22 वर्षीय Yalena Salas नावाच्या विद्यार्थ्यांचे आहे.
या व्यतिरिक्त, आम्हाला दुसर्या भाषेच्या संकेतस्थळावर 2 सप्टेंबर 2019 रोजी छापलेल्या लेखात प्राध्यापकाचा व्हायरल फोटो आढळून आला. गूगल ट्रान्सलेट मदतीने अनुवाद केला असता या लेखात देखील प्राध्यापकाच्या कडेवर दिसणारे बाळ त्यांचे नसून विद्यार्थ्याचे आहे असे म्हटले आहे.
Conclusion
पडताळणी दरम्यान आढळून आलेल्या तथ्यांनुसार हे स्पष्ट झाले की, प्राध्यापकाचा बाळासोबतचा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे. त्यांच्यासोबत असणारे बाळ त्यांचे नाही तर एका 22 वर्षीय विद्यार्थिनीचे आहे.
Result- Misleading
Our Sources
CNN- https://cnnespanol.cnn.com/2016/07/13/profesor-carga-al-bebe-de-su-alumna-para-que-ella-pueda-tomar-apuntes/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.