Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
श्रीराम आणि राममंदीरचे चित्र असलेली पाचशे रुपयांची नोट आली आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. पाचशे रुपयांच्या नोटेवर श्रीराम आणि राम मंदिराचे चित्र घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, 500 रुपयांच्या नोटेवर आता भगवान श्रीराम आणि राम मंदिराचे चित्र घातले जाणार आहे. किंवा अशी चित्रे घातलेली नवी नोट आली आहे.
आम्हाला हा दावा व्हाट्सअप टिपलाइन (9999499044) वर देखील प्राप्त झाला असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

या व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, सर्वप्रथम आम्ही संबंधित कीवर्डसह Google वर ही माहिती शोधली, परंतु आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही बातमी आढळली नाही. भारत सरकार एवढा मोठा निर्णय घेते आणि त्यावर एकही बातमी प्रसिद्ध होत नाही, हे अविश्वसनीय आहे.
पुढील तपासात आम्ही पंतप्रधान मोदींच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) पेजवर अशा कोणत्याही निर्णयाशी संबंधित कोणती माहिती दिलेली आहे का? हे शोधले मात्र काहीच सापडले नाही. यासोबतच आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आणि X खाते देखील शोधले, परंतु अशा निर्णयाशी संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.
पुढील तपासात, आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर सध्या वापरात असलेल्या 500 रुपयांच्या नोटांशी संबंधित माहिती शोधली. सर्व प्रकारच्या भारतीय नोटांची ओळख वेबसाईटवर Know your notes (तुमची नोट ओळखा) या सीरिज अंतर्गत स्पष्ट करण्यात आली आहे. या मालिकेतील 500 रुपयांच्या नोटेबद्दल दिलेल्या माहितीमध्ये, आम्हाला आढळले की नवीन 500 रुपयांच्या नोटेचा आकार 66mm x 150mm आहे. नोटांचा रंग दगडी राखाडी आहे. नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधींचा फोटो आहे. या नोटची प्रमुख नवीन थीम म्हणजे भारतीय वारसा स्थळ – लाल किल्ला.

आमच्या चौकशीतून आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की, लाल किल्लाचे असलेले चित्र हटवून 500 रुपयांच्या नोटेवर भगवान श्रीराम आणि राम मंदिराचा फोटो लावण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. व्हायरल झालेली पोस्ट खोटी आहे.
Our Sources
Google Search
Information given on the official website of RBI.
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम कोमल सिंग यांनी केले असून ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Komal Singh
January 24, 2024
Kushel Madhusoodan
January 23, 2024
Prasad S Prabhu
January 20, 2024