Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkनिरोगी राहण्यासाठी हाताच्या व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखविणारी व्यक्ती बत्रा हॉस्पिटलमधील डॉक्टर बजाज नाही

निरोगी राहण्यासाठी हाताच्या व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखविणारी व्यक्ती बत्रा हॉस्पिटलमधील डॉक्टर बजाज नाही

(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)

बत्रा हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे माजी प्रमुख ‘डॉ बजाज’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. हाताच्या व्यायामाचा एक संच प्रदर्शित करून जो कथितपणे एखाद्याला फिट आणि निरोगी राहण्यास मदत करेल, असा दावा करण्यात आला आहे.

एका ट्विटर वापरकर्त्याने UdthaBollywood (@BanCheneProduct) या व्यक्तीचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, जो वेगवेगळ्या प्रकारे हात मारताना, घासताना आणि मुक्का मारताना दिसत आहे. हे व्यायाम करणार्‍या व्यक्तीचा असा दावा आहे की ते व्यायाम कधीही आणि कुठेही केले जाऊ शकतात आणि यामुळे रक्ताभिसरण, पचन आणि मूड सुधारण्यासाठी फायदा होऊ शकतो.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हे डॉ. बजाज आहेत. एमडी, डीएम. #बत्राहॉस्पिटलमधील #कार्डिओलॉजीचे पूर्वीचे प्रमुख. या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते दररोज फक्त ७ मिनिटांचा व्यायाम सुचवतात आणि तुम्ही तंदुरुस्त आणि टाचेपासून डोक्यापर्यंत आरोग्यवान राहू शकता.” फेसबुक आणि ट्विटरवर ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

Fact Check/ Verification

व्हिडिओच्या कॉमेंट विभागात जाताना, आम्हाला एका वापरकर्त्याची कॉमेंट दिसली की व्हिडिओमधील माणूस डॉ बजाज नसून चेन्नईतील मिस्टर प्रकाश नावाचा उद्योजक आहे. वापरकर्त्याने 5 एप्रिल 2020 रोजी ‘seechangeprakash’ या चॅनेलने अपलोड केलेल्या त्याच व्हिडिओची यूट्यूब लिंक देखील शेअर केली.

आम्ही YouTube व्हिडिओचे काळजीपूर्वक विश्लेषण केले, व्यायाम दाखवणारी व्यक्ती डॉक्टर असल्याचा उल्लेख आढळला नाही. Google वर ‘sechangeprakash’ साठी कीवर्ड शोध घेतल्यानंतर, आम्हाला seechangeworld.in या व्यवस्थापन सल्लागार वेबसाइटवर नेण्यात आले.

वेबसाइटनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस, एस. प्रकाश, ‘सी चेंज वर्ल्ड’ या सल्लागार कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. seechangeworld.in वर उपलब्ध असलेल्या त्यांच्या प्रोफाइलमध्ये प्रकाश यांचा एक धोरणात्मक विचारवंत आणि टर्नअराउंड स्पेशलिस्ट म्हणून उल्लेख आहे.

निरोगी राहण्यासाठी हाताच्या व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखविणारी व्यक्ती बत्रा हॉस्पिटलमधील डॉक्टर बजाज नाही
Courtesy: seechangeworld.in
Courtesy: seechangeworld.in

न्यूजचेकरने या व्हायरल व्हिडिओबाबत एस. प्रकाश यांच्याशी संपर्क साधला. प्रकाश यांनी पुष्टी केली की व्हायरल व्हिडीओमध्‍ये ते स्वतःच आहेत, डॉ बजाज नाही. प्रकाश यांनी स्पष्ट केले की ते डॉक्टर नसून मॅनेजमेंट ट्रेनर आहेत आणि हा व्हिडिओ 2020 पासून खोट्या दाव्यासह फिरत आहे.

आम्हाला डॉ राजीव बजाज नावाचे हृदयरोगतज्ज्ञ बत्रा हॉस्पिटल, दिल्ली येथे काम करत असल्याचे आढळले. डॉ. बजाज यांच्याशी संपर्क साधल्यावर आम्हाला माहिती मिळाली की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरीच कोणीतरी आहे, ते अर्थात डॉ. बजाज नाहीत. व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीने केलेला दावा खरा आहे का, या प्रश्नावर डॉ. बजाज म्हणाले की, मला तो व्हिडिओ नीट पाहायचा आहे.

Conclusion

आरोग्याच्या फायद्यासाठी हाताचे व्यायाम सुचवणारा माणूस डॉक्टर नाही असा निष्कर्ष काढता येतो. तथापि, व्हिडिओमध्ये दाखवलेले हाताचे व्यायाम खरोखर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत की नाही याची पुष्टी आम्ही करू शकलो नाही.

Rating: False

Our Sources

YouTube video, uploaded by ‘seechangeprakash’ on April 5, 2020
Quote of S Prakash, CEO See Change
Quote of Dr Rajiv Bajaj, Cardiologist, Batra Hospital, Delhi

तुम्‍हाला एकाद्या क्‍लेमची फॅक्ट-तपासणी करायची असेल, फीडबॅक द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर 9999499044 वर व्हॉट्सअप करा किंवा checkthis@newschecker.in वर ईमेल करा.

Most Popular