Monday, March 20, 2023
Monday, March 20, 2023

घरFact CheckWeekly Wrap: नोटेवर शिवरायांचा फोटो, फ्रीजमधील वस्तूंनी कँसर आणि मोदींनी शिंदेंना ढकलले...

Weekly Wrap: नोटेवर शिवरायांचा फोटो, फ्रीजमधील वस्तूंनी कँसर आणि मोदींनी शिंदेंना ढकलले तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

“भारत सरकारने छत्रपती शिवरायांचा फोटो २०० रुपयांच्या नोटेवर छापण्याचा निर्णय घेतला आहे,” असा दावा या आठवड्यात करण्यात आला. फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या वस्तू खाल्ल्याने महिलांना कँसर होत असल्याचा, दावा व्हायरल करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

नोटेवर शिवरायांच्या फोटोचा निर्णय, फ्रीजमधील वस्तूंनी महिलांना कँसर आणि मोदींनी एकनाथ शिंदेंना ढकलले

मुस्लिमांनी ते मान्य केले?

न्यायालयीन सुनावणी दरम्यान मुस्लिमांनी हे मान्य केले की अन्नात थुंकणे म्हणजे ‘हलाल’ असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

नोटेवर शिवरायांच्या फोटोचा निर्णय, फ्रीजमधील वस्तूंनी महिलांना कँसर आणि मोदींनी एकनाथ शिंदेंना ढकलले

छत्रपतींचा फोटो नोटेवर?

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो २०० रुपयांच्या नोटेवर छापण्यात येणार आहे, असा दावा करण्यात आला होता. एका संपादित फोटोचा आधार घेऊन हा चुकीचा दावा करण्यात आल्याचे आमच्या तपासात आढळले आहे.

नोटेवर शिवरायांच्या फोटोचा निर्णय, फ्रीजमधील वस्तूंनी महिलांना कँसर आणि मोदींनी एकनाथ शिंदेंना ढकलले

मोदींनी शिंदेंना ढकलले?

नागपुरात वंदे भारत रेल्वेचे उदघाटन करताना आडवे आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढकलून बाजूला केले असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात अपूर्ण व्हिडीओ शेयर करून हा दिशाभूल करणारा दावा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

नोटेवर शिवरायांच्या फोटोचा निर्णय, फ्रीजमधील वस्तूंनी महिलांना कँसर आणि मोदींनी एकनाथ शिंदेंना ढकलले

तो व्हिडीओ सुमन कल्याणपूर यांचा नाही

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर या वयाच्या ८४ व्य वर्षीही उत्तम गातात असे सांगून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. हा व्हिडीओ दुसऱ्याच महिलेचा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.

नोटेवर शिवरायांच्या फोटोचा निर्णय, फ्रीजमधील वस्तूंनी महिलांना कँसर आणि मोदींनी एकनाथ शिंदेंना ढकलले

या कारणाने महिलांना होतो कँसर?

फ्रीज मध्ये जास्त काळ ठेवण्यात आलेल्या वस्तूंच्या वापरातून महिलांना कँसर होतो असा दावा टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र आमच्या तपासात असा दावा चुकीचा संदर्भ देऊन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नोटेवर शिवरायांच्या फोटोचा निर्णय, फ्रीजमधील वस्तूंनी महिलांना कँसर आणि मोदींनी एकनाथ शिंदेंना ढकलले

हे तर बात्रा हॉस्पिटलचे डॉ. बजाज नव्हेच

हाताच्या कसरती करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ बात्रा हॉस्पिटलच्या डॉ. बजाज यांच्या नावाखाली व्हायरल करण्यात येत होता. मात्र ती व्यक्ती डॉ. बजाज नसल्याचे आमच्या तपासात उघड झाले.

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: [email protected]

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular