Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: नाशिक येथून हरवलेली अश्विनी सोनावणे सुखरूप आहे, ती स्वतः प्रियकरासोबत...

Fact Check: नाशिक येथून हरवलेली अश्विनी सोनावणे सुखरूप आहे, ती स्वतः प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट

Claim
नाशिक येथून अश्विनी देविदास सोनावणे ही मुलगी अचानक बेपत्ता झाली असून तिच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे.
Fact
सदर तरुणी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते पोलीस स्थानकात हजर झाली असून तिने आपल्या प्रियकरासोबत आपण स्वतः आलो असून त्याच्याशी लग्न केल्याचे स्पष्ट केले आहे.

मुलाखतीसाठी जात असलेली नाशिक येथील तरुणी बेपत्ता झाली आहे. तिला तिच्या घरी पोहोचविण्यासाठी मदत करा. असा दावा करणारा एक मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या व्हायरल झाला आहे.

Fact Check: नाशिक येथून हरवलेली अश्विनी सोनावणे सुखरूप आहे, ती स्वतः प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट
Courtesy: Twitter@Sgirish1665S

“महाराष्ट्रातील सर्व बांधवाना माहिती देण्यात येते की नाशिक येथील ,,अश्विनी देविदास सोनवणे,, (वय 25) ही नाशिक वरून इंटरव्ह्यू साठी 15 तारखेला सकाळी 6 वा मुबई नाका बस स्थानकावरून मुबई साठी गेली परंतु रस्त्यातच बेपत्ता झाली आहे अश्विनी दिदींचे वडील गेले 32 वर्ष मिलेटरी मध्ये देशाचे रक्षण करता आहेत आता त्याच्या परिवाराचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे तरी हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर करून आपल्या अश्विनी दिदी ला घरी पोहचवण्यास मदत करावी ही महाराष्ट्रातील बांधवाना नम्रतेची विनंती
संपर्क 1)9423668007(भाऊ) 2)8329610247(भाऊ) 3) 7011791210(वडील)” असे हा मेसेज सांगतो.

न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) समान दावा प्राप्त झाला.

Fact Check: नाशिक येथून हरवलेली अश्विनी सोनावणे सुखरूप आहे, ती स्वतः प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट

Fact Check/ Verification

अश्विनी देविदास सोनावणे संदर्भात हा दावा मोठ्याप्रमाणात केला जात असल्याने आम्ही सदर मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचा संपर्क होऊ शकला नाही. आम्ही कीवर्ड सर्च च्या माध्यमातून यासंदर्भात शोध घेतला असता, आम्हाला व्हायरल पोस्ट सापडल्या. दरम्यान आम्ही व्हायरल पोस्टचा बारकाईने तपास सुरु केला.

@Sgirish1665S या ट्विटर युजरने केलेल्या पोस्टच्या कॉमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सदर तरुणी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते पोलीस स्थानकात हजर झाल्याची माहिती मिळाली.

या पोस्टमध्ये अश्विनी हीच नातेपुते पोलीस स्थानकासमोर थांबलेला फोटोही पाहायला मिळाला. माळशिरस तालुक्यातील मोरूची या गावातील प्रवीण मच्छिन्द्र खिलारे या तरुणाशी तिने विवाह केल्याचे आम्हाला या पोस्टमध्ये पाहायला मिळाले. आणखी शोध घेतला असता, याच विषयावर @shubhmatepatil या युजरने केलेल्या पोस्टवर नाशिक शहर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून केलेली कॉमेंट आम्हाला पाहायला मिळाली.

Fact Check: नाशिक येथून हरवलेली अश्विनी सोनावणे सुखरूप आहे, ती स्वतः प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट
Courtesy: Twitter@nashikpolice

यावरून आम्हाला सदर तरुणी बेपत्ता झाली असून सुखरूपपणे सापडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाशी ती विवाहबद्ध झाली आहे. अशी माहिती मिळाली.

आम्ही यासंदर्भात नातेपुते पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता, “व्हायरल फोटोमध्ये दिसणारी तरुणी अश्विनी देविदास सोनावणे ही सज्ञान असून, तिने स्वतः पोलीस स्थानकात हजर होऊन आपण स्वतः आपल्या प्रियकराशी लग्न केल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नाही.” अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी कोणाचीही फिर्याद नसल्याने आता ही पोस्ट व्हायरल करणे थांबवा असे आवाहन नातेपुते पोलिसांनी केले आहे.

शोध घेत असताना आम्हाला आपलं महानगर ने १९ जून २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी मिळाली.

Fact Check: नाशिक येथून हरवलेली अश्विनी सोनावणे सुखरूप आहे, ती स्वतः प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट
Courtesy: My Mahanagar

अश्विनी ही मुंबईला मुलाखतीसाठी न जाता गायब झाली. त्यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत विवाह केला आहे. असे स्पष्ट झाले आहे. असे आम्हाला या बातमीतही वाचायला मिळाले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात नाशिक येथील अश्विनी ही तरुणी अचानक गायब झालेली नसून ती आपल्या प्रियकरासाठी गेल्याचे आणि त्याच्याशी विवाह करून सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Partly False

Our Sources
Tweet made by User Laxman Choudhari on June 18, 2023
Tweet made by Nashik City Police on June 18, 2023
News published by My Mahanagar on June 10, 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular