Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact CheckFact Check: आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ ११ वर्षे जुना

Fact Check: आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ ११ वर्षे जुना

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पक्षनेते आदित्य ठाकरे यांची नक्कल केली.
Fact

भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरेंची नक्कल केली तेंव्हा ते शिवसेनेत नव्हते तर राष्ट्रवादीत होते. ११ वर्षे जुना व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला जात आहे.

आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नक्कल त्यांच्याच पक्षातील भास्कर जाधव यांनी केली असे सांगत हा दावा शेयर केला जात आहे.

ट्विटरच्या बरोबरीनेच फेसबुकवरही हा दावा आम्हाला पाहायला मिळाला.

Fact Check: आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ ११ वर्षे जुना
Courtesy: Facebook/ Vikas Pawar

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडीओसंदर्भातील तपासासाठी आम्ही सर्वप्रथम ‘भास्कर जाधव शिवसेना-आदित्य ठाकरे टीका’ असे कीवर्ड सर्च केले. आम्हाला News 18 लोकमत चॅनेलने ३० मे २०१३ रोजी प्रसिद्ध केलेला एक व्हिडीओ सापडला.

संबंधित व्हिडीओ रिपोर्टमधील भास्कर जाधव यांचा व्हिडीओ आणि व्हायरल व्हिडीओ समान असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यामध्ये भास्कर जाधव हे शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन देण्याचे आवाहन करतानाही दिसतात. व्हिडीओ रिपोर्टच्या शेवटी शिवसेना ठाकरे गटाच्या तत्कालीन नेत्या नीलम गोर्हे यांची यासंदर्भातील प्रतिक्रियाही पाहायला मिळते. “त्यांना (भास्कर जाधव) लग्नाच्या निमित्ताने शरद पवार यांनी फटकारलं होतं यामुळे अजित पवार यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला आहे.” असे नीलम गोर्हे यांनी सांगितले आहे.

व्हायरल व्हिडिओतील राष्ट्रवादी पक्षाचे समर्थन आणि शिवसेनेवर टीका यासंदर्भात शोध घेतांना मूळचे शिवसेनेचे असलेल्या भास्कर जाधव यांनी २००४ साली उमेदवारी नाकारण्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. २०१३ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी तेथून २०१९ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. अशी माहिती आम्हाला मिळाली. टीव्ही ९ मराठीने ९ एप्रिल २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या लेखात याची माहिती मिळते.

Fact Check: आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ ११ वर्षे जुना
Screengrab of TV 9 Marathi

चार वर्षांपूर्वी दिव्य मराठीने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

Fact Check: आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ ११ वर्षे जुना
Screengrab of Divya Marathi

दरम्यान शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती तो ११ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ असून त्यावेळी भास्कर जाधव शिवसेनेचे नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते, हे स्पष्ट होते.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरेंची नक्कल केली तेंव्हा ते शिवसेनेत नव्हते तर राष्ट्रवादीत होते. ११ वर्षे जुना व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला जात आहे, हे स्पष्ट होते.

Result: Missing Context

Our Sources
Google search
Video published by News 18 Lokmat on May 30, 2013
Article published by TV9 Marathi on April 9, 2021
News published by Divya Marathi


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular