Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact CheckFact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी...

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
मीरा रोडच्या घटनेनंतर पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्यांना बेदम मारहाण केली.
Fact
नाही, हा व्हिडिओ मीरा रोड येथे नुकत्याच घडलेल्या घटनेशी संबंधित नाही.

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर 21 जानेवारीला रविवारी संध्याकाळी मुंबईतील मीरा रोड परिसरातील नया नगरमधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कथित दगडफेकीच्या घटनेनंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीनंतर परिसरात तणाव वाढला. मीरा रोड हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली.

दरम्यान, मीरा रोड येथील नुकत्याच घडलेल्या घटनेशी जोडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये पोलीस काही लोकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. मात्र, आमच्या तपासणीत आम्हाला आढळून आले की हा व्हिडिओ मीरा रोड हिंसाचाराशी संबंधित नाही.

व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे 30 सेकंदांचा आहे. या व्हिडिओतील पहिल्या दृश्यात काही तरुण तुरुंगात बंद आहेत. पुढे व्हिडिओमध्ये खाकी वर्दी घातलेले दोन पोलिस काही तरुणांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही
Courtesy: X@27kuraneUttam

X च्या बरोबरीनेच आम्हाला हा दावा फेसबुकवरही आढळला.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही
Courtesy: Facebook/ Vijay Shinde

Fact Check/Verification

Newschecker ने सर्वप्रथम लॉकअपमध्ये उपस्थित तरुणाच्या घटनास्थळाची आणि दृश्यांची चौकशी केली. यासाठी जेव्हा आम्ही व्हिडिओच्या कीफ्रेमच्या मदतीने रिव्हर्स इमेज सर्च केली तेव्हा आम्हाला 12 जून 2022 रोजी टेलिग्राफ या न्यूज वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये व्हायरल दृश्यांशी जुळणारे चित्र आढळले.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही
 Courtesy: Telegraph

भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ जून 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचाराची माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. या हिंसाचारात यूपी पोलिसांनी जवळपास 9 जिल्ह्यांत 300 हून अधिक लोकांना अटक केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. परंतु रिपोर्टमध्ये या फोटोचे खरे ठिकाण नमूद केलेले नाही.

मात्र, या काळात आम्हाला दैनिक जागरण संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेले रिपोर्टही आढळले. दैनिक जागरणच्या रिपोर्टमध्ये हे चित्र सहारनपूर कोतवालीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. असेही म्हटले आहे की 10 जून 2022 रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या निदर्शने आणि गोंधळानंतर सहारनपूर पोलिसांनी 64 जणांना अटक केली होती. यातील काही जणांना सहारनपूर कोतवालीतही ताब्यात घेण्यात आले.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही
Courtesy: Dainik Jagran

त्याच वेळी, 12 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या पत्रिकाच्या रिपोर्टमध्ये हे चित्र सहारनपूरचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही
Courtesy: Patrika

आमच्या तपासात आम्ही सहारनपुर पोलिसांच्या अधिकृत X खात्यावरील 10 जून 2022 पासून 12 जून 2022 केलेले सर्व ट्विटही पाहिले, पण आम्हाला संबंधित दृश्य असणारे ट्विट मिळाले नाही. त्यामुळे हे व्हायरल सीन सहारनपूर कोतवाली येथील आहे, असे आम्ही ठामपणे सांगू शकत नाही, परंतु आतापर्यंतच्या आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, व्हायरल दृश्याचा मीरा रोड येथील नुकत्याच झालेल्या घटनेशी संबंध नाही.

यानंतर आम्ही तरुणांना पोलिसांकडून मारहाण केल्याचे दृश्य तपासले. 15 जून 2022 रोजी NDTV या न्यूज वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये आम्हाला हा व्हिडिओ आढळला.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही
Courtesy: NDTV India

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात भाजपच्या दोन माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून 10 जून 2022 रोजी सहारनपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर हिंसक आंदोलन झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अनेक तरुणांना अटक केली होती. या निदर्शनाच्या एका दिवसानंतर, 11 जून 2022 रोजी, भाजप आमदार शलभ मणी त्रिपाठी यांनी त्यांच्या X खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये दोन पोलिस काही तरुणांना बेदम मारहाण करताना दिसत होते. व्हिडिओ ट्विट करताना भाजप आमदाराने लिहिले होते, “बंडखोरांना रिटर्न गिफ्ट”.

व्हिडिओ समोर आल्यानंतर एनडीटीव्हीने त्यात दिसलेल्या काही तरुणांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. व्हिडिओमध्ये दिसणारे चार तरुण मोहम्मद सैफ, मोहम्मद तारिफ, राहत अली आणि इम्रान यांना त्यांच्या कुटुंबीयांनी ओळखले. हे सर्वजण सहारनपूरचे रहिवासी होते. तरुणाची ओळख पटल्यानंतर एनडीटीव्हीने सहारनपूरचे तत्कालीन एसएसपी आकाश तोमर यांच्याशी संपर्क साधला होता, त्यावेळी त्यांनी हा व्हिडिओ सहारनपूरचा असल्याचे स्पष्टपणे नाकारले होते.

यावेळी, आम्हाला अमर उजालाच्या वेबसाइटवर या व्हिडिओशी संबंधित एक रिपोर्ट सापडला. 19 जून 2022 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की सुरुवातीला सहारनपूर पोलिसांनी हा व्हिडिओ जिल्ह्यातील असल्याचा इन्कार केला होता. मात्र नंतर प्रकरण वाढत गेल्याने तत्कालीन एसएसपींनी एसपी सिटीला व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश दिले.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, युवकांना पोलिस कोठडीत मारहाण होत असल्याची दृश्ये असलेल्या व्हायरल व्हिडिओचा मीरा रोड येथील नुकत्याच घडलेल्या घटनेशी संबंध नाही.

Result: False

Our Sources
Report Published by Telegraph on 12th June 2022
Report Published by NDTV on 15th June 2022
Report Published by Amar Ujala on 19th June 2022

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular