Authors
Claim
कॅमेऱ्यावर मुलांचे अपहरण दाखवणारा चोरून काढलेला व्हिडीओ.
Fact
संबंधित व्हिडीओ स्क्रिप्टेड असून कोणत्याही वास्तविक घटनेशी संबंधित नाही.
कॅमेऱ्यावर मुलांचे अपहरण दाखवणारा व्हिडिओ असे सांगत मुखवटाधारी माणसे मुलांची खरेदी आणि विक्रीची किंमत यावर चर्चा करतानाचा 15 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक बालकांना अपहृत करण्यात आल्याचे वास्तविक फुटेज असल्याचा दावा केला आहे. व्हिडिओमध्ये, अनेक मुले जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली असून त्यांचे तोंड आणि हात बांधलेले दाखवले आहेत. त्यांच्या शेजारीच शाळेच्या दप्तरांचा ढीग पडलेला दिसतो. या मुलांचे अपहरण करून आता त्यांची विक्री केली जात असल्याचे चोरून चित्रीकरण करणारा माणूस सांगतो.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही गुगलवर त्याच्या की-फ्रेमचे रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला. आम्हाला फेसबुकवर 30 जून 2022 रोजी गफूर इब्राहिम नामक युजरने अपलोड केलेली व्हिडिओची आवृत्ती पाहायला मिळाली. व्हिडीओचे कॅप्शन गुगल वर ट्रान्सलेट केले असता, “शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांचे अवयव विकणारे टोळके” असे भाषांतर आम्हाला वाचायला मिळाले.
0:30 सेकंदाच्या मोठ्या व्हिडिओमध्ये, हिंदी आणि इंग्रजीमध्ये एक अस्वीकरण होते, ज्यामध्ये म्हटले होते, “कृपया व्हिडिओ डिस्क्लेमर काळजीपूर्वक वाचा. ही खरी घटना नाही.”
1:20 च्या सुमारास, व्हिडिओमध्ये आणखी एक अस्वीकरण होते ज्यात म्हटले होते, “हा व्हिडिओ संपूर्ण काल्पनिक आहे, व्हिडिओमधील सर्व घटना स्क्रिप्टेड आहेत आणि जागरूकता हेतूने बनवल्या आहेत. हे कोणत्याही प्रकारच्या कृतींना प्रोत्साहन देत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रथेची बदनामी करत नाही. या व्हिडिओचा कोणत्याही खऱ्या घटनेशी संबंध नाही.”
हा स्क्रिप्टेड व्हिडिओ कोणी बनवला याची आम्ही स्वतंत्रपणे पुष्टी करू शकलो नाही, दरम्यान तो वास्तविक नाही हे अस्वीकरणावरून स्पष्ट होते.
हा दावा पूर्वीही व्हायरल झाला होता. त्यावेळी न्यूजचेकरने त्याचे फॅक्टचेक केले होते. आपण ते इथे वाचू शकता.
Conclusion
न्यूजचेकरच्या तपासात असे समोर आले आहे की, लहान मुलांचे अपहरण करणाऱ्यांचा चित्रित केलेला व्हिडिओ हा स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे.
Result: Missing Context
Our Sources
Video uploaded on facebook on June 30, 2022
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा