Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मराठा आंदोलनात बॉम्ब स्फोट करण्याचा कट उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
Fact
ही घटना पाच वर्षे जुनी आहे. जुन्या बातमीचे कटिंग पुन्हा व्हायरल करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रात २०१० पासून आंदोलन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर एक पेपर कटिंग व्हायरल होत आहे. मराठा आंदोलनात बॉम्ब स्फोट करण्याचा कट उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. असा दावा X (पूर्वीचे ट्विटर) वर केला जात आहे.
हाच समान दावा आम्हाला फेसबुकवरही पाहायला मिळाला.
हा दावा व्हाट्सअपच्या माध्यमातूनही मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
न्यूजचेकर ने व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी सदर पेपर कटिंग काळजीपूर्वक वाचले. यामध्ये “नालासोपारा पुणे सांगली कोल्हापूर तसेच औरंगाबाद मधून पकडण्यात आलेल्या सनातन आणि भिडे गुरुजीच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांचा मराठा आंदोलनादरम्यान स्फोट घडवण्याचा कट होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे. मराठा आंदोलनाला बदनाम आणि विस्कळीत करण्यासाठीच हे स्फोट घडवले जाणार होते अशी माहितीही उघड झाली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा आणि पुणे-सांगली-कोल्हापूर तसेच औरंगाबाद राज्याच्या अन्य भागांमधून सुमारे चौदा संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना अटक केली. यातील वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुख्य हिंदुत्ववादी अतिरेकी मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद आणि नालासोपारा येथे हल्ला घडवण्याचा कट रचत होते. बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा डाव होता. गोंधळ निर्माण करणे आंदोलन विस्कळीत करणे आणि बदनाम करणे हा त्यांचा उद्देश होता. मराठा मोर्चातच हा स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता.” अशी माहिती वाचायला मिळाली. पेपर कटिंग वर ‘लोकपत्र’ असा उल्लेख आढळला.
यावरून “मराठा आंदोलनात बॉम्ब स्फोट करण्याचा कट” असे किवर्ड शोधले असता आम्हाला लोकपत्र ची ही बातमी सापडली नाही. दरम्यान लोकसत्ता ने १६ ऑगस्ट २०१८ रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी आमच्या निदर्शनास आली.
“हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट?” अशा शीर्षकाखाली असलेल्या या बातमीतून आम्हाला, “या प्रकरणाच्या चौकशीतून माहिती समोर आली की, पकडले गेलेले आरोपी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथील मराठा आंदोलनादरम्यान स्फोट घडवण्याचा कट रचत होते. मात्र हा स्फोट मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी करण्यात येणार होता. तसेच या स्फोटाची तिव्रता कमी असणार होती, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा स्फोट करण्यात येणार होता, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले.” अशी माहिती मिळाली.
यासंदर्भात आणखी तपास करताना आम्ही ‘घातपाताचा कट उधळला तिघांना बेड्या” असे किवर्ड युट्युबवर शोधले असता, ABP माझा ने ११ ऑगस्ट २०१८ रोजी अपलोड केलेला एक व्हिडीओ आम्हाला पाहायला मिळाला.
एबीपी माझा ने दिल्यानुसार “महाराष्ट्रात चार प्रमुख शहरांमध्ये घातपाताचा कट रचलेल्या आरोपींना दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ने अटक केली आहे. हे आरोपी हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असून वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर अशी त्यांची नावे आहेत. एटीएसने त्यांच्याकडून तब्बल २० देशी बॉम्ब जप्त केले.” अशी माहिती आम्हाला समजली.
यावरून व्हायरल झालेली बातमी आणि बातमीचे कटिंग सध्याचे नसून ऑगस्ट २०१८ मधील म्हणजेच पाच वर्षे जुने असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
अशाप्रकारे आमच्या तपासात मराठा आंदोलनात बॉम्ब स्फोट करण्याचा कट उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हा दावा सध्याच्या घटनेवर नसून पाच वर्षे जुन्या घटनेचा आधार घेत दिशाभूल करण्यासाठी केला जातात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google Search Results
News published by Loksatta Online on August 16, 2018
Video uploaded by ABP MAJHA on August 11, 2018
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा