Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
हा व्हिडिओ कर्नाटकातील बेळगावमध्ये बसवलेल्या अंडरग्राउंड हायड्रॉलिक (स्मार्ट बिन) कचरा पेटीचा आहे.
हा व्हिडिओ बेळगावचा नसून तुर्की येथील आहे. मात्र, बेळगावमध्ये खरोखरच अशा प्रकारच्या सेन्सरयुक्त अंडरग्राउंड हायड्रॉलिक कचरा पेट्या बसवण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलाय की, बेळगाव दक्षिणचे भाजप आमदार अभय पाटील यांनी भारतात पहिल्यांदाच हायड्रॉलिक अंडरग्राउंड स्मार्ट बिन सुरू केली असून ती सेन्सरच्या माध्यमातून भरल्यावर सफाई कर्मचाऱ्यांना सूचना पाठवते.

अशा पोस्ट २०२१ पासून फेसबुकवर शेयर करण्यात आल्या असल्याचे आमच्या निदर्शनास आले.


व्हायरल क्लिपमधील न्यूजचेकरने कीफ्रेम्स शोधल्या असता, 27 ऑगस्ट 2013 रोजी Hidro-Mak नावाच्या तुर्की यूट्यूब चॅनेलवरील तोच व्हिडिओ आढळला.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कचरा उचलणाऱ्या ट्रकवर “Üsküdar Belediyesi” असे नाव आणि क्रमांक 34 EF 4247 दिसतो, जे तुर्कीतील Üsküdar नगरपालिकेचे आहे.

यावरून हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ तुर्कीचा आहे, बेळगावचा नाही.
व्हायरल व्हिडिओ बेळगावचा नसला तरी बेळगाव दक्षिण मतदारसंघात अशा हायटेक कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत.
Vijayavani मध्ये 10 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित वृत्तानुसार, बेळगाव दक्षिण मतदारसंघात आमदार निधीतून ₹1.56 कोटी खर्च करून 18 हाय-टेक अंडरग्राउंड स्मार्ट बिन्स बसवण्यात आले. प्रत्येक बिनमध्ये सेन्सर्स बसवले असून किंमत ₹6.5 लाख आहे. कचरा उपसा करण्यासाठी ₹80 लाखांची विशेष गाडीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती मिळाली.
AllAboutBelgaum मध्ये 9 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित माहितीनुसार, आमदार अभय पाटील यांनी श्री बसवेश्वर सर्कल येथे “देशातील पहिला सेन्सरयुक्त अंडरग्राउंड डस्टबिन” असा दावा करत या प्रकल्पाचे उद्घाटन केले.
ETV Bharat Karnataka च्या 28 मार्च 2025 च्या रिपोर्टनुसार, हे स्मार्ट बिन्स मागील दोन वर्षांपासून कार्यरत आहेत आणि लवकरच बेळगाव उत्तर भागातही या प्रकल्पाचा विस्तार करण्याची योजना आहे.
बेळगावमध्ये खरोखरच अंडरग्राउंड हायड्रॉलिक स्मार्ट बिन्स बसवण्यात आले आहेत. मात्र, या दाव्यासोबत व्हायरल होणारा व्हिडिओ भारतातील नसून तुर्कीचा आहे.
Q1. व्हायरल व्हिडिओ बेळगावचा आहे का?
नाही. तो तुर्कीतील Üsküdar नगरपालिकेचा आहे.
Q2. बेळगावमध्ये अशी सुविधा आहे का?
होय. सध्या त्या कार्यरत असून सेन्सर सिस्टमसह आहेत.
Q3. मग चुकीचा व्हिडिओ का वापरला गेला?
स्थानिक प्रकल्पाचा प्रचार वाढवण्यासाठी चुकीचा विदेशी व्हिडिओ वापरला गेला असावा.
Sources
YouTube Video by Hidro-Mak , Dated: August 27, 2013
Report by Vijayavani , Dated: December 10, 2022
Report allaboutbelgaum , Dated: December 9, 2022
Report by Etv Bharat Karnataka , Dated: March 28, 2025
Salman
December 2, 2025
Vasudha Beri
October 24, 2025
Pankaj Menon
October 3, 2025