Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने...

Fact Check: पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने बँकांना दिला आहे? खोटा आहे हा दावा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने बँकांना दिला आहे.

Fact
हा दावा खोटा आहे. अशाप्रकारचा कोणताही आदेश सरकारने बँकांना दिलेला नाही.

व्हाट्सअपवर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यावरील पैसे आता बँका सरकारला परत पाठविणार आहेत. कारण तसा आदेश सरकारने बँकांना दिला आहे. असे हा मेसेज सांगतो.

Fact Check: पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने बँकांना दिला आहे? खोटा आहे हा दावा
Screengrab of whatsapp claim

हा संदेश निवृत्त एसीपी विजयकुमार आरोटे यांनी जारी केला असल्याचे सांगितले जात आहे. मेसेज असा आहे. “आपल्या ग्रुप मध्ये पेन्शन घेणारे किंवा कोणाचे आई बाबा , भाऊ , बहीण किंवा इतर नातेवाईक , ज्यांना मासिक पेन्शन मिळते त्यांनी मिळणारी पेन्शन तशीच त्याच अकाउंट ला जमऊन / जमा करून ठेवू नका , दर महिन्याला काढून वापरा , किंवा इतर अकाउंट मधे भरा. कारण सरकारने आदेश सर्व बँकांना दिले आहेत , की जे कोणी सेवा निवृत्त कामगार हे पैसे काढत नाहीत त्यांना या पैशाची गरज नाही असे समजून त्यांचे पैसे परत शासनाला पाठवा. कृपया हा मेसेज सर्व ग्रुप वर पाठवा. एक सत्कर्म आपल्या हातून घडेल. सदरचा संदेश मा श्रीविजयकुमार आरोटे साहेब,निवृत्त ACP यांचेकडून प्राप्त.”

न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) समान दावा प्राप्त झाला.

Fact Check: पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने बँकांना दिला आहे? खोटा आहे हा दावा

Fact Check/ Verification

व्हायरल मेसेज मधील मजकुराची सत्यता तपासण्यासाठी न्यूजचेकरने सर्वप्रथम मेसेजच्या शेवटी लिहिलेल्या नावावर लक्ष केंद्रित केले. हा मेसेज “श्रीविजयकुमार आरोटे साहेब,निवृत्त ACP यांचेकडून प्राप्त” असे लिहिण्यात आले आहे. आम्ही या संबंधित नावासंदर्भात इंटरनेटवर शोध घेतला. दरम्यान या नावाची व्यक्ती अस्तित्वात असल्याचे दिसले नाही. आम्ही सर्व समाजमाध्यमांवर या नावाच्या व्यक्तीने अशाप्रकारचा संदेश शेयर केला आहे का? याचा शोध घेतला. मात्र तसे आढळले नाही.

कोणत्याही बँकेशी संबंधित व्यवहारांची निगराणी आणि आवश्यक सूचना RBI च्या माध्यमातून दिल्या जातात. आम्ही यासंदर्भात RBI च्या अधीकृत वेबसाईटवर पाहणी केली. आम्हाला पेन्शन च्या बँक खात्यावरील रक्कम सरकारला परत पाठविण्यासंदर्भात कोणतीही सूचना किंवा नोटिफिकेशन आढळले नाही.

RBI च्या FAQ सेक्शनमध्ये जाऊन आम्ही यासंदर्भात पाहणी केली असता, आम्हाला पेंशन संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहायला मिळाली.

Fact Check: पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने बँकांना दिला आहे? खोटा आहे हा दावा
Screengrab of RBI FAQ

सरकारी पेन्शनधारकांना वेळेत पेन्शन देण्यासंदर्भात RBI ने बँकांना सूचना देण्यासाठी काढलेले परिपत्रकही आमच्या निदर्शनास आले. यामध्ये आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र न वापरलेल्या पैशांना परत पाठविण्याची कोणतीही सूचना नाही.

Fact Check: पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने बँकांना दिला आहे? खोटा आहे हा दावा
Screengrab Of RBI Circular

शेवटी आम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेचे रिजनल हेड हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आम्हाला सांगितले. ” व्हायरल दाव्याला कोणताही आधार नाही. सरकारने अशी कोणतीही सूचना बँकांना दिलेली नाही. पेन्शन धारक आपल्या बँक खात्यावर जमा झालेली पेन्शनची रक्कम स्वतंत्रपणे खर्च करू शकतात किंवा तशीच आपल्या खात्यावर ठेऊ शकतात. याचा पूर्ण अधिकार त्यांना असतो. एकदा खात्यावर रक्कम जमा झाली की ती काढायची की तशीच ठेवायची हे दुसरे कोणीही ठरवू शकत नाही. शिवाय ती रक्कम बँकांना जप्त करून सरकारकडे पाठविण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेऊ नका.” असे त्यांनी सांगितले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात पेन्शनच्या रक्कमेसंदर्भात व्हायरल दाव्याला कोणताच आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा संदेश खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

Result: False

Our Sources
FAQ published by RBI
Master circular of RBI regarding pension disbursement
Conversation with Regional Head of Cental Bank Of India Mr. Hemant Patil

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular