Authors
Claim
गुड मॉर्निंग मेसेजवर 18% पर्यंत जीएसटी आकारला जाणार.
Fact
हा दावा खोटा आहे. 2018 मध्ये, होळीच्या निमित्ताने, नवभारत टाइम्सने ही बातमी व्यंग-विनोदाच्या स्वरूपात प्रकाशित केली होती.
गुड मॉर्निंग मेसेजवर 18% पर्यंत जीएसटी आकारला जाणार आहे, असे सांगत एका बातमीचे कात्रण वापरून दावा केला जात आहे.
पेपर कटिंगचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दावा केला जात आहे की गुड मॉर्निंग मेसेजवर 18 टक्के जीएसटी लावला जाईल. पेपर कटिंगमध्ये असे लिहिले आहे की दररोज सकाळी लाखो गुड मॉर्निंगचे संदेश पाठवले जातात. त्यामुळे इंटरनेटचा वेग कमी होतो. त्यामुळे मेसेज कमी करण्यासाठी आणि इंटरनेट स्पीड सुधारण्यासाठी सरकार ही पावले उचलत आहे. हे जीएसटी बिलही महिन्याच्या शेवटी मोबाईल बिलासह भरावे लागणार आहे.
Fact Check/Verification
व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्ड वापरून Google वर शोधले. त्यानंतर आम्हाला कळले की हे पेपर कटिंग 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. आम्हाला त्याच्याशी संबंधित दैनिक भास्कर आणि एबीपी माझाने प्रसिद्ध केलेल्या बातम्यासुद्धा पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये हा व्हायरल मेसेज चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
तपासादरम्यान आम्हाला कळले की हे वृत्तपत्राचे कटिंग नवभारत टाइम्सचे आहे. जे अलीकडचे नाही तर जुने आहे, मार्च 2018 मध्ये, 2 मार्च 2018 च्या आवृत्तीत, नवभारत टाइम्सने ही बातमी आपल्या पहिल्या पानाच्या शीर्षस्थानी प्रकाशित केली होती. 2018 मध्ये, होळीच्या निमित्ताने, NBT च्या संपादकांनी ठरवले होते की पहिले पान व्यंगाच्या स्वरूपात प्रकाशित केले जाईल. ही बातमी देखील त्यापैकीच एक होती, याशिवाय इतर अनेक बातम्या व्यंग्य म्हणून प्रसिद्ध झाल्या. या सर्व बातम्यांच्या खाली लिहिले होते, बुरा न मानो होली है।
तपासादरम्यान, आम्हाला NBT चे पत्रकार नरेंद्र नाथ मिश्रा यांचे एक ट्विट देखील सापडले. ज्यात त्यांनी सांगितले होते की, संबंधित पानावर प्रसिद्ध झालेली बातमी व्यंग-विनोद म्हणून प्रसिद्ध झाली होती. पण काहीनी या बातम्यांना गंभीर स्वरूपात घेतले.
ABP Live ने 20 मार्च 2018 रोजी एक व्हिडीओ रिपोर्टच्या माध्यमातून या व्हायरल पेपर कटिंगचे सत्य जगासमोर आणले होते. हा रिपोर्ट येथे पाहता येईल.
Conclusion
आमच्या तपासणीत आढळलेल्या तथ्यांनुसार, गुड मॉर्निंग मेसेजवर 18 टक्के जीएसटी लावण्याच्या बातम्या खोट्या आहेत. 2018 मध्ये, होळीच्या मुहूर्तावर, नवभारत टाइम्सने ही बातमी व्यंग-विनोदाच्या स्वरूपात प्रसिद्ध केली होती. तेव्हापासून ही बातमी आणि पेपर कटिंग व्हायरल होत आहे.
Result: False
Our Sources
News published by Dainik Bhaskar
News published by ABP News on March 20, 2018
Video report published by ABP Live on March 20, 2018
Tweet made by Narendra Nath Mishra on March 2, 2018
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा