Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
जपानी मुलाच्या फोटोची हृदयस्पर्शी पार्श्वभूमी.
Fact
हे व्हायरल चित्र जपानचे आहे, परंतु चित्रासोबत व्हायरल होत असलेला हृदयस्पर्शी दावा दिशाभूल करणारा आहे.
एका मुलाचा कृष्णधवल फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, जपानमधील दुसऱ्या महायुद्धादरम्यान काढलेले हे छायाचित्र आहे, जिथे एक मुलगा त्याच्या भावाचा मृतदेह पाठीवर घेऊन उभा आहे. यादरम्यान त्या मुलाचे तिथे उभ्या असलेल्या एका सैनिकासोबत संभाषण झाल्याचे बोलले जात आहे, त्याची हृदयस्पर्शी घटना या फोटोसोबत शेअर केली जात आहे.

“जपानमध्ये युद्घाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला नीट दफन करावं या भावनेने तो दूरवर चालत आला होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला… प्राण गेलेल्या भावाला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस…ते ओझे खाली टाकून दे..म्हणजे तुला हलके वाटेल…. त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला की, हे ओझे नाहीये सर. हा माझा भाऊ आहे..हे ऐकून त्या सैनिकाच्या डोळ्यांत पाणी तरळले…तेव्हा पासून हा फोटो जपानमधे “सिम्बॉल ऑफ unity” म्हणून प्रसिद्ध झाला… “हे ओझे नाहीये सर… हा माझा भाऊ आहे…” हा बोध किती सुंदर आहे… आपले (लहान/मोठे)भाऊ बहीण आपल्यावर ओझे नाहीत… आयुष्याच्या वाटेवर चालताना ते पडले तर त्यांना उचला, दमले तर आधार द्या, ते चुका करतील तर त्यांना समजावून सांगा… मोठ्या मनाने माफ करा, आणि जर अख्ख्या जगाने त्यांना दूर लोटले तर तुम्ही त्यांना पाठीवर घ्या, कारण ते ओझे नाहीये…. ते तुमचे, स्वतः चे भाऊ/बहिण आहेत…Just be there for them… Let them know, I am here for you… बास्स…” असे फोटोसोबत शेयर केली जाणारी कॅप्शन सांगते.
दाव्याची सत्यता शोधण्यासाठी, आम्ही व्हायरल चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला हे चित्र ALAMY वेबसाइटवर मिळाले. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो 1945 मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातीलच आहे.
याची मदत घेऊन आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगलवर सर्च केले. आम्हाला ww2wrecks वर एक लेख सापडला, जिथे व्हायरल प्रतिमा देखील उपलब्ध आहे. येथे दिलेल्या माहितीनुसार, हे छायाचित्र अमेरिकन मरीन अधिकारी आणि फोटोग्राफर Joe O’Donnell यांनी क्लिक केले आहे. छायाचित्रकार O’Donnell यांची त्या छायाचित्राबाबतची मतेही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

त्याने लिहिले आहे की, “मी दहा वर्षांचा मुलगा जवळ येताना पाहिला. तो एका मुलाला पाठीवर घेऊन जात होता. हा मुलगा इतर जपानी मुलांपेक्षा खूपच वेगळा दिसत होता. तो मुलगा काही महत्त्वाच्या कामानिमित्त या ठिकाणी आला आहे, असे मला वाटले. त्याच्या पायात बूट नव्हते. त्याच्या पाठीवर एक मूल होते जे गाढ झोपलेले दिसत होते. मुलगा तिथे पाच-दहा मिनिटे उभा होता. पांढरे मुखवटे घातलेले काही लोक त्याच्या जवळ गेले आणि शांतपणे मुलाला त्याच्या पाठीवरून काढू लागले. त्यावेळी माझ्या लक्षात आले की तो ज्या मुलाला पाठीवर घेऊन चालला होता ते मूळ मृत आहे. त्यांनी मुलाचे हात-पाय पकडून त्याला पेटवून दिले. मुलगा तिथे शांतपणे उभा राहून शांत मुद्रेत ज्वाला पाहत होता. काही वेळाने तो मुलगा शांतपणे तिथून निघून गेला.” या संपूर्ण अकाऊंटमध्ये व्हायरल पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे मुलगा फोटोग्राफर किंवा कोणत्याही सैनिकाशी बोलत असल्याचा उल्लेख नाही.
तपासादरम्यान, आम्हाला Rare Historic Pic आणि Ranker सारख्या वेबसाइटवर व्हायरल चित्रे देखील आढळली. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1945 मध्ये जपानमधील नागासाकीचा आहे. त्यावेळी अमेरिकेने नागासाकी आणि हिरोशिमा या दोन जपानी शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. या वेबसाइट्सवरही या फोटोचे वर्णन JoeO’Donnell यांनी प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार एक मुलगा आपल्या भावाचा मृतदेह पाठीवर घेऊन तो जाळण्याची वाट पाहत होता. या मुलाने कोणाही सैनिकाशी बोलल्याचा उल्लेख कुठेही नाही.

याशिवाय अमेरिकन अधिकारी आणि छायाचित्रकार जो ओडोनेल यांनी त्यांच्या Japan 1945 या पुस्तकात या फोटोबद्दल लिहिले आहे, परंतु तेथेही संबंधित व्हायरल हृदयस्पर्शी प्रसंगाचा उल्लेख नाही. आम्हाला 2017 मध्ये पोप फ्रान्सिसने या फोटोसह पोस्टकार्ड छापल्याची माहिती देखील मिळाली. यामध्ये मुलाने शिपायाशी केलेल्या संभाषणाचा उल्लेख नाही. या फोटोवरील एक लेख FullFact या ब्रिटीश स्वतंत्र सत्य-तपासणी माध्यम संस्थेने मार्च 2022 मध्ये प्रकाशित केला आहे.
एकंदरीत, हे व्हायरल चित्र जपानमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु चित्रासह व्हायरल होत असलेला हृदयस्पर्शी दावा दिशाभूल करणारा आहे.
Our Sources
ALAMY
WW2Wrecks
Rare Historic Pic
Ranker
Catholicnews
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025