Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
एका पाकिस्तानी खासदार अक्षय कुमार आणि रवीन टंडन यांच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या प्रसिद्ध गाण्याच्या रिमिक्सवर नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. अनेक वेबसाईट्सने देखील पाकिस्तानी खासदार द अमीर लियाकत हुसैन हे टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर नाचले असल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. न्यूजचेकरने केलेल्या पडताळणीत नाचत असलेली व्यक्ती पाकिस्तानी खासदार नसून एक प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक असल्याचे समोर आले आहे.
न्यूज 18 लोकमतने पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत हुसैन ‘टिप टिप बरसा पानी’ वर नाचल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

बातमी येथे तर संग्रहित बातमी येथे पहा.
लोकमत ने देखील याच दाव्याने बातमी प्रसिद्ध केली आहे.

लोकमतची बातमी येथे वाचा आणि संग्रहित बातमी येथे वाचा.
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीत देखील, “आधी रवीना टंडन आणि नंतर कतरिना कैफ. जेव्हा-जेव्हा दोघांनी टिप टिप बरसा पानी’ वर डान्स केला, तेव्हा जग त्यांचं फॅन झालं. पण आता पाकिस्तानातूनही एक व्हिडिओ आला आहे. या गाण्यावर डान्स करतानाचा पाकिस्तानी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या गाण्यावर त्याने इतका आकर्षक डान्स केला आहे की व्हिडिओ पाहून लोक त्याचे चाहते झाले आहेत.” असे म्हटले आहे.

संग्रहित बातमी येथे वाचा.
ANI या वृत्तसंस्थेने देखील हेच वृत्त दिले आहे.
आमिर लियाकत हुसैन हे एक पाकिस्तानी टेलिव्हिजन होस्ट आणि राजकारणी आहेत जो ऑगस्ट 2018 पासून पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत. हुसैन त्यांनी याआधी पाकिस्तानच्या रिअॅलिटी टीव्ही शो जीवे पाकिस्तान मध्ये ‘नागिन डान्स’ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
पाकिस्तान खासदार टिप टिप बरसा पानी’ नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ मूळतः @taimoorze युजरने पोस्ट केला होता जो अमन मलिक आणि इतर अनेकांनी शेअर केला होता. हे लक्षात घेतले पाहिजे की @taimoorze यांनी असे कोणतेही प्रतिपादन केलेले नाही, परंतु ‘टिप टिप बरसा पानी’ या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला आहे.
जेव्हा न्यूजचेकरने @taimoorze द्वारे पोस्टचा कमेंट्स तपासल्या तेव्हा अनेक युजर्सनी संबंधित व्यक्ती नृत्यदिग्दर्शक शोएब शकूर आहे हे म्हटले असल्याचे आढळून आले.

आणखी एका युजर @Sherazakhtar08 ने शोएब शकूरच्या इंस्टाग्राम पेज पोस्ट केले, जे तपासल्यावर न्यूजचेकरला तोच व्हिडिओ तिथे पोस्ट केलेला आढळला. न्यूजचेकरने फेसबुकवर ‘@Shoaibshakoor’ शोधले आणि HS स्टुडिओच्या पेजवर पोस्ट केलेला तोच व्हिडिओ सापडला.

हे देखील वाचा: शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, टिप टिप बरसा पानी’ वर डांसचा व्हायरल व्हिडिओ पाकिसानमधील खासदार आमीर लियाकत हुसैन यांचा नाही तर शोएब शकूर या नृत्यदिग्दर्शकाचा आहे.
Social media posts
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.