Thursday, February 9, 2023
Thursday, February 9, 2023

घरFact Checkसोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ Russia-Ukraine conflict दरम्यानचा नाही

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ Russia-Ukraine conflict दरम्यानचा नाही

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ Russia-Ukraine conflict दरम्यानचा असल्याचा दावा व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत अनेक प्रेते जमीनीवर पडलेली दिसत आहेत. याचे रिपोर्टिंग एक न्यूज रिपोर्टर करत असताना अचानक एक प्रेत आपल्या शरीरावरील कपडा व्यवस्थित करताना दिसत आहे. तितक्याच एक महिला त्याला कॅमेरा चालू आहे सांगण्यासाठी धावत त्याच्याजवळ जाते आणि ते प्रेत पुन्हा पांघरुन घेऊन निपचित पडते. यावरुन टिका करण्यात येत आहे की, टिव्ही चॅनल्स  कशा प्रकारे  Russia-Ukraine conflict दरम्यान पूर्वनियोजित रिपोर्टिंग करताना दिसत आहेत. 

Russia-Ukraine conflict
फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

फेसबुक पोस्ट इथे पहा.

फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

फेसबुक पोस्ट इथे पहा.

Russia-Ukraine Conflict युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. मंगळवार, 1 मार्च रोजी, रशियाने राजधानी कीववर रॉकेट गोळीबार केला, ज्यात 70 हून अधिक युक्रेनियन सैनिक आणि डझनभर नागरिक ठार झाले.

Fact Check/Verification

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ Russia-Ukraine conflict दरम्यानचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी प्रथम इन-व्हिड टूलच्या मदतीने व्हिडिओला काही कीफ्रेममध्ये रूपांतरित केले, नंतर रिव्हर्स इमेजच्या याच्या मदतीने शोध घेतला असता OE24.TV या युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओ आढळून आला. 

हा व्हिडिओ आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात 4 फेब्रुवारी 2022 रोजी वातावरण बदलाच्या धोरणाविरोधात आंदोलनादरम्यानचा असल्याचे आढळून आले. 

याशिवाय आम्हाला news.at या वेबसाईटवर देखील या आंदोलनाची बातमी आढळून आली. याचा अनुवाद केला. यात म्हटले आहे की, शुक्रवारपर्यंत, ऑस्ट्रिया 400 दिवसांपासून हरितगृह वायू कमी करण्याच्या लक्ष्याशिवाय आहे. Fridays For Future platform ने चेतावणी दिली की हे जीवघेणे आहे, प्रत्येक टन CO2 सह हवामान संकट वाढले आहे. दुपारी, कार्यकर्त्यांनी व्हिएन्ना येथील फेडरल चॅन्सेलरीसमोर 49 “climate totes” सादर केले. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, ऑस्ट्रियामध्ये  सुमारे 200,000 टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामुळे 2100 पर्यंत दररोज 49 मृत्यू होतील.

news.at च्या 04/02/22 रोजी बातमीचा स्क्रिनशाॅट

Conclusion

अशा प्रकारे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ Russia-Ukraine Conflict दरम्यानचा नसून वातावरणातील बदलाबाबतच्या धोरणांविरोधात आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात केलेल्या आंदोलनाचा आहे. 

Result: False Context/False

Sources

OE24.TV‘s YouTube video on 04/02/22
News.at’s 04/02/22 news

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular