Fact Check
Weekly wrap: अभिनेता टिकू तलसानियांनी इस्लाम स्वीकारला ते युक्रेनमध्ये रशियाची लढाऊ विमाने घुसल्याचा व्हिडिओ, या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्युज

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

अभिनेता टिकू तलसानियाने इस्लाम स्वीकारला? व्हायरल दाव्याचे हे आहे सत्य
चित्रपट अभिनेता टिकू तलसानियाने इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. व्हायरल फोटोमध्ये टिकू तलसानिया वाढलेल्या दाढीमध्ये दिसत आहे. एका फेसबुक वापरकर्त्याने म्हटले आहे की, “ प्रसिद्ध कॉमेडियन टिकू तलसानिया डायरा #इस्लाम धर्मात सामील झाला आहे.” पण हे खरे नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

भाजप आमदाराने मुंबईत नमाजसाठी लावलेले बॅरिकेड्स हटविले? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य
मुंबईतील कांदिवली येथे ‘नमाज’साठी शिवसेनेने रस्ता बंद केल्याच्या विरोधात भाजप आमदार योगेश सागर यांना आक्षेप घेत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सागर एक बॅरिकेड्स ढकलून पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. पण हे खरे नाही. काॅंगेसच्या आंंदोलनच्या वेळी सागर यानी बॅरिकेड्स हटविले होते. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

अमित शहांनी योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या व्यासपीठावरून फटकारले नाही, चुकीचा दावा व्हायरल
अमित शहांनी योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या व्यासपीठावरून फटकारले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. उत्तरप्रदेशात आज विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पिलीभीत, मतदान होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी विकास न केल्याबद्दल फटकारले असल्याचा युजर्सनी एक व्हिडिओ शेअर करत केला आहे.पण हे खरेे नाही. अमित शहांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

शिवसेना नेत्याने फुकट वडापावसाठी दुकानदाराला मारहाण केली? जाणून घ्या सत्य
शिवसेना नेत्याने फुकट वडापावसाठी दुकानदाराला मारहाण केल्याच्या दाव्याने व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती दुकानदाराला बांबूने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आह की, विलेपार्ले येथे वडापाव फुकट दिले नाही म्हणुन शिवसेना कार्यकर्त्यानी दुकानदाराचा बांबूने सत्कार केला. पण हा व्हिडिओ आताचा नाही तर पाच वर्षांपुर्वीचा आहे. याचे फॅक्ट चेक इथे वाचा.

युक्रेनमध्ये रशियाची लढाऊ विमाने दाखल झाल्याचा नाही व्हायरल व्हिडिओ? हे आहे सत्य
युक्रेनमध्ये रशियाची लढाऊ विमाने दाखल झाल्याचा एक व्हिडिओ अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या बातम्यांत दाखविला आहे. या व्हिडिओत काही विमानांचा ताफा आकाशात घिरट्या घालताना दिसत आहे. पण हे खरे नाही. व्हिडिओ युक्रेनमध्ये रशियाची लढाऊ विमाने दाखल झाल्याचा नाही, तर 2020 मध्ये रशियामध्ये झालेल्या एअर शोचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.