Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
कुंभमेळ्यात 400 साधुंनी अग्निदेवतेला शरीर अर्पण केले मात्र त्यांना काहीही झाले नाही असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक साधू स्वत:ला आगीच्या हवाी करतो, मात्र त्याला काहीही होत नाही असे दिसते.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कुंभमेळा कव्हर करताना, बीबीसी टीमने कुंभस्नानापूर्वी सुमारे 400 साधू अग्निदेवतेला त्यांचे शरीर अर्पण करताना पाहिले. त्यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ काढला. जळणाऱ्या लाकडापासून निर्माण होणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे बीबीसी कॅमेरा टीमला आगीपासून दूर जावे लागले. आगीच्या लाकडावर पडलेल्या साधूंना काहीच झाले नाही हे पाहून ते थक्क झाले. अग्निशामक रसायनांची उपस्थिती ओळखण्यासाठी त्यांनी त्यांच्या कपड्यांची चाचणी देखील केली, परंतु ते सापडले नाहीत. साधू मंत्रोच्चार करण्यात पूर्णपणे तल्लीन झाले होते. या साधूंना सिद्ध साधू म्हणतात. बीबीसी टीमने नंतर हे त्यांच्या चॅनेलवर प्रसारित केले.”

फेसबुक पोस्ट इथे पहा.

फेसबुक पोस्ट इथे पहा
कुंभमेळ्यात 400 साधुंनी अग्निदेवतेला शरीर अर्पण केले मात्र त्यांना काहीही झाले नाही असा दावा करणारा व्हिडिओ सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही किफ्रेम्स रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला आज तकच्या बातमीचा एक व्हिडिओ आढळून आला. 23 एप्रिल 2017 रोजीचा व्हिडिओ आढळून आला. यात व्हायरल व्हिडिओशी मिळती जुळती दृश्ये असून साधू सु्द्धा तेच असल्याचे स्पष्ट झाले. बातमीनुसार या साधुंचे नाव स्वामी रामभाऊ असून ते तामिळनाडू मधील तंजावर येथील आहेत. स्वामी 45 वर्षांपासून आगीवर झोपत आहेत. ते जेव्हा आगीवर झोपतात तेव्हा त्यांचे कपडे काही प्रमाणात जळतात मात्र स्वामींना काहीही होत नाही. पम ते लगेच हे कपडे अंगावरुन फेकून देतात तेव्हा मात्र ते जळून खाक होतात.असे बातमीत म्हटले आहे.
बातमीच्या शीर्षकात The Fire Yogi of Tanjore असे लिहिले असल्याने आम्ही याच किवर्ड्सचा वापर करुन स्वामी रामभाऊ यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला आज तकचाच 2010 मधील व्हिडिओ आढळून आला यात त्वचातज्ञ डाॅ. शैला अग्रवाल यांनी स्वामी रामभाऊ यांच्या आगीवर सलग चार तास झोपण्याच्या बाबतीत खुलासा केला आहे. त्या म्हणतात की, स्वामींचा थेट आगीशी संबंध येत नाही कारण त्यांनी कपडा गुंडाळला आहे. त्यांनी आगीची झळ लागण्यास सुरुवात झाली की ते कुस बदलतात,एका जागी स्थिर राहत नाहीत. शिवाय त्यांनी इतकी वर्षे हा प्रयोग केला असल्याने त्यांनी सहनशक्ती देखील वाढवली असेल. त्यांनी अनेक आहारात बदल केले आहेत खाणंपिणं कमी केल्याने शरीरात ओलावा कमी असल्याने देखील त्वचा लवकर जळणार नाही.
याच व्हिडिओत रेशनलिस्ट सोसायटीचे अध्यक्ष सनल एडामराकू यांनी फायर योगींबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, स्वामीनीं हा प्रयोग मागील 11 वर्षापासून सुरु केला आहे. मी त्यांच्याकडे जाऊन याची खात्री केली होती. आमच्याकडे खात्रीशीर पुरावे आहेत की, स्वामी पूर्णपणे आगीत झोपत नाहीत. कधी आग त्यांच्या पुढे तर कधी मागे असते. ते आग खास पद्धतीने पेटवतात. गोव-या थोड्या ओल्या करून पेटवतात त्यामुळे धूर जास्त होतो आणि बाजून आगीच्या ज्वाळा दिसतात त्यामुळे पाहणा-याला वाटते की ही आग खूप मोठी आहे. तसेच त्यांच्या अंगावरील कापडदेखील विशिष्ट प्रकारचे आहे. त्याच्यावर काही प्रक्रिया करुन ठेवली जाते त्यामुळे त्याला दोन-तीन तास तरी आग लागली जात नाही. आम्ही तामिळनाडूत त्यांचा पर्दाफाश केला होता, म्हणून ते आता कर्नाटकात जात आहे. हा सगळा नजरेचा खेळ आहे.
याशिवाय आम्हाला टाईम्स आॅफ इंडियाची 17 नोव्हेंबर 2009 रोजीची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, तामिळनाडूतील तंजावर येथील 80 वर्षीय रामबाबू स्वामीजींनी रविवारी सकाळी होम अग्नीवर झोपून समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, असे उत्तर कर्नाटकातील घनगापूर गावात त्यांचे भक्त सांगतात, मात्र डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि तर्कवादी या घटनेला ‘भ्रम’ मानून फेटाळून लावत आहेत.

आमच्या पडताळणीत आढळले की, कुंभमेळ्यात 400 साधुंनी अग्निदेवतेला शरीर अर्पण केले असल्याचा दावा चुकीचा आहे. हा व्हिडिओ तंजावरमधील स्वामी रामभाउंचा आहे मात्र डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि तर्कवादी या घटनेला ‘भ्रम’ मानून फेटाळून लावला आहे.
Result: Misleading
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.