Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
नेपाळच्या पर्वतांमध्ये 201 वर्षीय बौद्ध भिक्खू सापडला असून तो जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे.
एका सोशल मीडिया यूजरने हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘नेपाळच्या पर्वतांमध्ये एक तिबेटी साधू सापडला आहे. वयाच्या 201 व्या वर्षी ते जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असल्याचे मानले जाते. तो खोल समाधी किंवा ध्यानाच्या अवस्थेत असतो, ज्याला “ताकते” म्हणतात. जेव्हा त्याला पहिल्यांदा डोंगराच्या गुहेत सापडले तेव्हा लोकांना वाटले की ती ममी आहे. मात्र, वैज्ञानिकांनी केलेल्या तपासणीनंतर ती ममी नसून जिवंत मानव असल्याचे आढळून आले.
संग्रहित फेसबुक पोस्ट इथे पाहू शकता.
फेसबुक पोस्ट इथे पाहू शकता.
फेसबुक पोस्ट इथे पाहू शकता.
8 फेब्रुवारी 2012 रोजी livehindustan.com ने प्रकाशित केलेल्या लेखानुसार, काही लेप लावून मृतदेह वर्षानुवर्षे जतन करण्याच्या प्रक्रियेला ममी म्हणतात. ही प्रथा प्राचीन काळी इजिप्त देशात सुरू झाली, जिथे लोक काही पेस्ट लावून आणि पट्ट्या बांधून त्यांच्या प्रियजनांचे आणि प्राण्यांचे मृतदेह वर्षानुवर्षे सुरक्षित ठेवत. त्यांचा असा विश्वास होता की मृत शरीराची काळजी घेतल्याने मृत व्यक्ती पुढील जन्मात त्याचे शरीर परत मिळवते.
अहवालानुसार, ममीची उत्पत्ती अरबी भाषेतील मुमियापासून झाली आहे. अरबी भाषेत मुमिया म्हणजे मेण, कोळशाच्या डांबराने संरक्षित केलेली वस्तू. इजिप्तमध्ये काही ठिकाणी आजही ममी बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने ते शोधण्यास सुरुवात केली, परंतु या प्रक्रियेत आम्हाला या फोटोशी संबंधित कोणताही अहवाल मिळाला नाही.
त्यानंतर आम्ही फोटोसह काही कीवर्ड वापरून Google वर शोधू लागलो. यादरम्यान आम्हाला काही फोटो मिळाले. त्यांच्यावर क्लिक केल्याने आम्हाला 24 जानेवारी 2018 रोजी express.co.uk ने प्रकाशित केलेला लेख आढळून आला. लेखानुसार, या बौद्ध भिक्षूचे नाव Luang Phor Pian होते. या बौद्ध भिक्खूचे 16 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले, परंतु दोन महिन्यांनंतर जेव्हा बौद्ध भिक्खूची शवपेटी उघडली गेली तेव्हा दोन महिने उलटूनही भिक्खूुचा मृतदेह कुजला नाही आणि बौद्ध भिक्खूच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटले.
मिळालेला अहवाल वाचल्यानंतर असे आढळून आले की, शेअर केलेला फोटो Luang Phor Pian या बौद्ध भिक्षूचा असण्याची शक्यता आहे.
यानंतर आम्ही Google वर Luang Phor Pian हा कीवर्ड शोधला. या दरम्यान आम्हाला अनेक मीडिया रिपोर्ट्स प्राप्त झाले. त्यानुसार, व्हायरल झालेला फोटो थायलंडच्या Luang Phor Pian यांचा आहे, ज्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी 16 नोव्हेंबर 2018 रोजी निधन झाले.
मीडिया रिपोर्ट्स इथे, इथे आणि इथे पाहता येईल.
अशाप्रकारे, आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले आहे की शेअर केलेले छायाचित्र नेपाळमध्ये सापडलेल्या 201 वर्षीय जिवंत तिबेटी भिक्षूचे नसून थायलंडमधील बौद्ध भिक्षू लुआंग फोर पियानचे आहे. ज्यांचे 16 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. आता हा फोटो भ्रामक दाव्याने शेअर केला जात आहे.
Media reports
Express.co.uk – https://www.express.co.uk/news/weird/909367/dead-monk-smiling-two-months-after-death
TimesNow – https://www.timesnownews.com/the-buzz/article/buddhist-monk-smile-incredible-images-thailand-bangkok-lopburi-luang-phor-pian-viral-cambodia/191796
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.