पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन दरडींमुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र पहायला मिळाले. असाच घाटात एक दरडीमुळे वाहतुक विस्कळीत झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ माळशेज घाटातील दरडीचा आहे. त्यामुळे कल्याण- अहमदनगर महामार्गावरुन प्रवास टाळावा.
माळशेज घाट, कल्याण-अहमदनगर की तरफ जानेवाले लोग कृपया सावधान रहे… 😱👇 pic.twitter.com/QVI174gjQU
— #DevOza | देव | 🇮🇳 (@devswarup_) July 26, 2021

Fact Check / Verification
व्हायरल फेसबुक पोस्टमधील व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फेसबुक पोस्टमधील एका कमेंटमध्ये हा व्हिडिओ माळशेज घाटातील नसून महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरील आंबोनळी घाटातील असल्याचा उल्लेख आढळून आला.
यानंतर आम्ही काही किवर्डसच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला आम्हाला एबीपी माझाची बातमी आढळून आली. या बातमीत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर- महाबळेश्वर महामार्गावरील आंबेनळी घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून वाहतुक खोळबंळी असल्याची माहिती देण्यात आली आहे व व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील या बातमीत दाखवण्यात आला आहे.

याशिवाय आम्हाला पब्लिक अॅपवर देखील हा व्हिडिओ आढळून आला. स्थानिक प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. यात म्हटले आहे की, महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात हा पाण्याच लोट आल्याने 250 गावांचा संपर्क तुटला आहे. हा 39 किलोमीटरचा घाट आहे. घाटातील धबधब्यांच्या वाढत्या पाण्यांच्या लोटामुळे ब-याच ठिकाणी वाहतुकीला अडथळा येत आहे.

Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ माळशेज घाटातील नसून महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरील आंबोनळी घाटातील आहे.
Result: Misleading
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा