Authors
Claim
महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली.
Fact
उत्तरप्रदेश येथील कासगंज येथे झालेल्या मारहाणीचा हा व्हिडीओ खोटा दावा करून व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली, असा दावा करीत सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“अमृत काळात प्रथमच महिला न्यायाधीश आणि महिला वकिलामध्ये मारामारी झाली ती ही महाराष्ट्रातील न्यायालयात वकिलाच्या प्रियकराला जामीन देण्यास न्यायमूर्तीनी नकार दिला होता या कारणास्तव हाणामारीला सुरवात झाली भविष्यात न्यायालयीन वाद अशा प्रकारे मिटवले जातील अस समजायला काहीही हरकत नाही” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
Fact Check/ Verification
न्यूजचेकरने प्रथम “न्यायाधीश वकील भांडण महाराष्ट्र” साठी कीवर्ड शोध घेतला, ज्याने अशा घटनेचे कोणतेही संबंधित रिपोर्ट दिले नाहीत.
त्यानंतर आम्ही व्हिडीओच्या कीफ्रेमचा रिव्हर्स इमेज सर्च केला, ज्यामुळे आम्हाला 29 ऑक्टोबर 2022 रोजीचे हे ट्विट मिळाले. ट्विटनुसार, कोर्टात एका जोडप्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन महिला वकिलांचा कासगंज कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात वाद झाला. असे लिहिलेले आढळले.
पुढील किवर्ड सर्चमुळे आम्हाला हा ANI चा रिपोर्ट मिळाला. जो 29 ऑक्टोबर 2022 रोजी द प्रिंटमध्ये प्रकाशित झाला, “कासगंज कौटुंबिक न्यायालयात दुसऱ्या वकिलासोबत भांडण केल्याबद्दल वकिलाविरुद्ध एफआयआर नोंदवला गेला.” उत्तर प्रदेशातील कासगंज कौटुंबिक न्यायालयात विरोधी पक्षांच्या बाजूने उपस्थित असलेल्या महिला वकिलांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता आणि नवभारत टाईम्सने सुद्धा प्रकाशित केले आहे.
Conclusion
उत्तर प्रदेशातील कासगंज येथील कौटुंबिक न्यायालयाबाहेर दोन वकिलांच्या भांडणाचा एक व्हायरल व्हिडिओ, “महाराष्ट्रातील न्यायालयातील न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली” असा खोटा दावा करीत शेअर केला जात आहे, हे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
Result: False
Sources
Tweet by B&B Legal on October 29,2022
News report by the Print on October 29,2022
News report by the Times of India on October 29,2022
News report by the Loksatta on October 30,2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा