Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact Checkजालन्यातील भाजपा नेत्याला पोलिसांकडून मारहाणीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल, हे आहे सत्य

जालन्यातील भाजपा नेत्याला पोलिसांकडून मारहाणीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात पोलिस एका व्यक्तीला काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ तेलगंणामधील हाॅस्पिटलमधील आहे,यातील पोलिस बेदम मारहाण करत असलेला व्यक्ती रुग्णवाहिका चालक आहे. जो आपल्याला भाडे मिळावे, रुग्णवाहिकेचा धंदा वाढावा यासाठी रुग्णांचे आॅक्सीजन बंद करुन त्यांना जीवे मारत असे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

पोलिसांकडून व्यक्तीला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही पोस्ट इंग्रजीत आहे. आम्ही त्याचा अनुवाद केला. यात म्हटले आहे की, तेलंगणातील निजामाबादमधील रुग्णालयात रुग्णवाहिका चालकाने ऑक्सिजन सिलिंडरची लाइन तोडली. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, हाॅस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून कोणीही मरण पावलेेले नाही, त्यामुळे त्याला भाडे मिळाले नाही, पैशाच्या कमतरतेमुळे त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले.

संग्रहित

फेसबुकवर अन्य युजर्सनी देखील मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ याच दाव्याने शेअर केल्याचे आढळून आले आहे.

Fact Check/Verification

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ आम्ही बारकाईने पाहिला असता त्यातील व्यक्ती तसेच पोलिस देखील मराठीत बोलत असल्याचे व एका पोलिसाच्या खांद्यावर महाराष्ट्र पोलिसाचा बॅच असल्याचे देखील आढळून आले. यावरुन हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ तेलंगणामधील नाही तर महाराष्ट्रातील आहे.

त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि याचे सत्य काय आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी वेगवेगळ्या किवर्ड्सचा वापर केला. या शोधादरम्यान आम्हाला divyamarathi.com वर एक बातमी आढळून आली ज्याता व्हायरल व्हिडिओतील दृश्याचा फोटो होता. यात म्हटले आहे की, सात ते आठ पोलिस भाजप युवा माेर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवालेला यांना काठी तुटेपर्यंत बेदम मारताना या व्हिडिअाेत दिसत अाहेत. हात जाेडून माफी मागत असतानाही अमानुष पद्धतीने मारहाण हाेत असल्याचे यात दिसते. घटना 9 एप्रिलची असून त्याचा व्हिडिओ अाता साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला झी 24 तास ची बातमी आढळून आली ज्यात हे प्रकरण नेमके कसे घडले याची माहिती देण्यात आली आहे. बातमीत म्हटले आहे की,शिवराज नारियलवाले हे 9 एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याचसुमारास गवळी समाजाचा एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक तेथे धुडघूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे अतिशय अर्वाच्य शब्दात शिविगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिविगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली.व्हीडिओ काढल्याच्या रागातून पण, त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हीडिओतून दिसून येते. गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 असे आठ पोलिस त्यांना घेरून अमानूष मारहाण करीत होते. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह 5 कर्मचा-यांना निलंबित करणयात आले असल्याची माहिती बातमी देण्यात आली आहे.

या प्रकरणी भाजपाचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते त्या संदर्भातील त्यांचे ट्विट देखील आम्हाला आढळून आले.

याशिवाय तेलंगणा राज्यातील निजामाबाद पोलिसांचे देखील एक ट्विट आढळून आले ज्यात म्हटले आहे की, निजामाबादमध्ये असा प्रकार घडलेला नाही.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ तेलंगणातील निजामाबादच्या रुग्णवाहिका चालकाला झालेल्या मारहाणीचा नसून जालन्यातील भाजपच्या युवा नेत्याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.

Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही

Result: False

Claim Review:  तेलंगणा पोलिसांकडून रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण
Claimed By: Viral Post
Fact Check: False

Our Sources

झी 24 तास – https://zeenews.india.com/marathi/marathwada/5-employees-including-police-sub-inspector-suspended-in-shivraj-nariyalwale-assault-case/567862


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular