Sunday, February 5, 2023
Sunday, February 5, 2023

घरFact Checkशेतात विहीर खोदतानाचा तो व्हिडिओ अमरावतीचा नाही, चुकीचा दावा व्हायरल होतोय

शेतात विहीर खोदतानाचा तो व्हिडिओ अमरावतीचा नाही, चुकीचा दावा व्हायरल होतोय

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केला जातोय की, शेतात विहीर खोदताना पाच मजुरांचा बुडून जागेवरच मृत्यू झाला. 

सदर पोस्टमध्ये असं म्हणलंय की, हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पुर्णाचा आहे. तिथे महेंद्र भगत यांच्या शेतात विहीर खोदताना अचानक वेगाने पाणी बाहेर आले की, तिथे काम करणाऱ्या ५ मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

शेअर केला जाणारा संदेश : 

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पुर्णा. येथील शेतकरी, महेंद्र भगत. यांच्या शेतात विहिर खोदते समयी.

अचानक इतक्या वेगाने पाणी बाहेर आलं की,विहिरीत काम करणा-या 5 मजुरांचा पाण्यात बुडून जागेवरच मृत्यू झाला.

सांगतील जातंय की, पाणी इतक्या प्रचंड वेगाने बाहेर येतंय की, कुणी जवळ सुध्दा उभं राहू शकतं नाही.

पहा निसर्गाचा चमत्कार.

FB Post शेतात विहीर खोदताना अमरावती
फेसबुकचा स्क्रिनशॉट – Ratan Wagh

Fact Check / Verification 

शेतात विहीर खोदताना पाच मजुरांचा बुडून जागेवरच मृत्यू झाला, या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही तो व्हिडिओ इन-वीड टूलवर टाकून शोधण्याचा प्रयत्न केला. 

त्यावेळी आम्हांला एक युट्यूब व्हिडिओ मिळाला. हा व्हिडिओ २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पीएलएल न्यूजने अपलोड केला आहे. 

त्या व्हिडिओनुसार, मुळात ही घटना मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील रामपूरमधील आहे. तिथे विहीर खोदताना अचानक तीव्र गतीने पाणी बाहेर आले. तेव्हा तिथे काम करणाऱ्या ७ मजुरांचा मृत्यू झाला. असं त्यात म्हटले आहे. पण त्याचबरोबर आम्हाला तीच व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणाची समजून शेअर केली आहे.

शेअरचॅटवर हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वी तर ग्रामआंचल न्यूज या युट्यूब वाहिनीने २०१८ मध्ये हा व्हिडिओ अपलोड केला असून तो मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील झरमधील आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर एमपी7 या पोर्टलने ३० मार्च २०२२ रोजी आणि जेबीके मारवाडी गीत या युट्यूब वाहिनीने ३१ मार्च २०२२ रोजी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तो मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील बमरोली गावातील आहे, असे त्यात म्हटले आहे.

टीएनसी लाईव्ह टीव्ही न्यूजने हा व्हिडिओ ५ नोव्हेंबर २०१८ रोजी अपलोड केला असून तो झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच या संदर्भातील अधिकृत कुठलीही बातमी आम्हाला मिळालेली नाही. आमचा याविषयीचा तपास सुरू आहे.

या व्यतिरिक्त न्यूजचेकरने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला. त्यांनी सांगितले,”अशी कुठलीही घटना इथे घडलेली नाही. ही चुकीची बातमी आहे.”

तसेच आम्ही अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितले,”ही बातमी खोटी आहे.”

हे वाचू शकता : गुजरातमधील आम आदमी पार्टीच्या रॅली संबंधितचा द न्यूयॉर्क टाइम्सचा खोटा स्क्रिनशॉट होतोय व्हायरल

Conclusion 

अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, शेतात विहीर खोदताना पाच मजुरांचा बुडून जागेवरच मृत्यू झाला. असा दावा केला जाणारा व्हिडिओ महाराष्ट्राच्या अमरावतीचा नाही. सदर व्हिडिओ २०१८ पासून युट्यूबवर उपलब्ध आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जुना असून २०२२ मधील नाही. पण हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती आम्हाला मिळू शकलेली नाही. आम्ही या व्हिडिओचा तपास करत आहोत. आम्हाला याविषयी आणखी माहिती मिळाली तर आम्ही लेख अपडेट करू.

Result : False Context / False

Our Sources

फोनवरून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी साधलेला संवाद

फोनवरून अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांच्याशी साधलेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular